वाडी-तांड्यावर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:13+5:302021-05-04T04:13:13+5:30

वीजपुरवठा खंडित; ग्राहक त्रस्त कळमनुरी: शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा भारनियमनाव्यतिरिक्त खंडित होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद ...

Water scarcity in Wadi-Tanda | वाडी-तांड्यावर पाणीटंचाई

वाडी-तांड्यावर पाणीटंचाई

Next

वीजपुरवठा खंडित; ग्राहक त्रस्त

कळमनुरी: शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा भारनियमनाव्यतिरिक्त खंडित होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडू लागली आहेत. महावितरण कंपनीने या बाबीची दखल घेऊन शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

वानरांचा उपद्रव वाढला

कळमनुरी: गत महिनाभरापासून ग्रामीण भागात वानरांनी उच्छाद मांडला आहे. पाण्याच्या शोधात आलेले वानरे भाजीपाल्यांची नासाडी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादक त्रस्त झाले आहेत. वनविभागाने वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नाल्यांवर औषध फवारणीची मागणी

औंढा नागनाथ: शहरातील मुख्य रस्ता तसेच इतर वॉर्डामध्ये नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वेळीच नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन नाल्यांची साफसफाई करून त्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हातपंप दुरुस्तीची मागणी

शिरड शहापूर: परिसरातील अनेक गावांतील हातपंप आजमितीस दुरुस्तीअभावी बंदच आहेत. पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांना दोन-दोन किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बंद पडलेले हातपंप दुरुस्त केल्यास नागरिकांची भटकंती थांबेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तेव्हा तालुका प्रशासनाने मे महिन्यात तरी हातपंप दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Water scarcity in Wadi-Tanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.