हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:40 AM2019-02-11T00:40:55+5:302019-02-11T00:41:15+5:30

तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.

 Water shortage on turmeric; The crisis of whims and kernels | हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

हळदीवर पाणीटंचाई; हुमणी-करपाचेही संकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यात यावर्षी नवीन हळदीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. पाणी टंचाईच्या मुख्य संकटासह हुमणी, करपाचे संकट हळदीवर असल्याने यावर्षी हळद उत्पादक चिंतेत आहेत.
वसमत तालुक्यातील मुख्य पीक असलेले हळद शेतकऱ्यांसाठी आधाराचे पीक ठरत आलेले आहे. राज्यात सर्वाधिक हळद पिकवणारा तालुका म्हणूनही वसमत प्रसिद्ध आहे. वसमतची उच्च दर्जाची हळद खरेदीसाठी राज्यभरातील हळद खरेदीदारांसह परप्रांतातील खरेदीदारही वसमत येथे येतात. वसमतच्या मोंढ्यात खरेदीदार मातब्बर उतरत असल्याने हळदीला दरही चांगला मिळतो. परिणामी शेतकरी हळद लागवडीवर भर देत गेले आहेत. मात्र आता पाणीटंचाईचे संकट समोर उभे राहीले आहे. गेल्या तीन वर्षांपासून धरण भरत नसल्याने हळदीला पाण्याचा फटका बसला आहे. ज्या शेतकºयांकडे पाण्याची व्यवस्था व हमखास पाणी आहे, असेच शेतकरी हळद लागवड करत आहेत.
तालुक्यात यंदा १७ हजार ५०० हेक्टर हळद लागवड झालेली आहे. जूनमध्ये पावसाचा ताण पडला. पावसाळ्यातच पाण्याचा ताण पडल्याने इतर पिके वाºयावर सोडून शेतकºयांनी हळदीवर लक्ष केंद्रित केले. हळदीलाच पाणी वापरले. मात्र आता बोअर व विहिरींचेही पाणी कमी होत आहे. त्यामुळे हळदीवर चांगलाच ताण पडला आहे.
अन् आता हळदीवर हुमणी व करपाचाही प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. हळदीवर पडलेल्या भुंग्यासाठी शेतकºयांनी एरंडीचे सापळेही लावले. रासायनिक औषधीही वापरली. या सर्व उपाययोजनांवर वेळ व पैसा खर्च झाला. आता हळदीवर काही भागात करपाही पहावयास मिळत आहे. या संकटावर मात करत आता हळदीला किती उतारा येतो, याची धास्ती शेतकºयांना आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव, पार्डी, सोमठाणा, कुरूंदा, कौठा, किन्होळा, सातेफळ, हयातनगर, परजना आदी भाग हळदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इसापूरच्या लाभक्षेत्रात पाण्याचा आधार असल्याने हळद काही प्रमाणात तग धरून आहे. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात हळदीला संघर्ष करावा लागतो आहे. फेब्रुवारी मार्चपर्यंत नवीन हळद येते. आता हळद काढणीच्या कामाला वेग येण्याचे दिसत आहेत. मात्र हळदीची अवस्था शेतकºयांना अस्वस्थ करणारी आहे. हळदीचा उतारा घटेलच मात्र हळदीच्या दर्जावरही परिणाम झाल्यास परत दर कमी मिळण्याची भीती; त्यामुळे दुहेरी फटक्याची चिंताही व्यक्त होत आहे.

 

Web Title:  Water shortage on turmeric; The crisis of whims and kernels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.