डबल मास्क घाला अन् काेरोना टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:28+5:302021-05-05T04:48:28+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय नाक व तोंडावाटेच कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्कचा ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
नाक व तोंडावाटेच कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्कचा वापर केल्यास संसर्गापासून दूर राहता येणे शक्य आहे. त्यासाठी मास्क सर्जिकल अथवा एन ९५ असल्यास अधिक चांगले. कोरोनाच नव्हे, तर दमा, धुळीची ॲलर्जी यापासूनही बचाव होतो. हवेतून पसरणारा संसर्ग टाळता येतो. टीबीसारखे रुग्ण मास्कमुळे कमी झाले आहेत.
मास्क कसा वापरावा?
मास्क नाक व तोंड झाकण्यासह सगळीकडून तोंडावर फिट असेल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाक व तोंडात इतर भागातून हवा जाता कामा नये. मास्क सिंगल असो वा डबल हे पथ्य न पाळल्यास काहीच उपयोगी नाही.
मास्काची जी बाजू बाहेरून आहे, तीच कायम बाहेरून असावी. त्यात बदल झाला, तर संसर्गाचा धोका आहे. मास्कच्या वरच्या भागास हात लावू नये.
सहसा वैद्यकीय वापरासाठीचे मास्कच वापरावेत
हे करा
मास्क वापरताना तो नाक व तोंड पूर्णपणे झाकेल, अशा पद्धतीने लावावा. नाकावरील पट्टी दाबून घ्यावी. तर इतर भागातून हवा जाता कामा नये. जी बाजू बाहेरून आहे, ती कायम तशीच राहावी. सिंगल सर्जिकल मास्कही योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे. गर्दीच्या ठिकाणी जायचे असल्यास डबल मास्क वरील नियमांप्रमाणे वापरल्यास संसर्गाचा धोका टळतो.
डॉ.अखिल अग्रवाल
हे करू नका
मास्क लावल्यानंतर त्याच्या वरच्या भागाला कधीही हात लावू नये. तो वारंवार काढू नये. मास्क काढताना मागच्या बाजूने पट्ट्यांना बोटांनी पकडून काढावा. घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकू नये. कागद अथवा प्लास्टीकमध्ये गुंडाळून कचराकुंडीत टाकावा. धुवायचा असेल, तर थेट सोडा व डेटॉलच्या पाण्यात टाका मात्र बाहेर ठेवू नका.
डॉ.यशवंत पवार
जिल्ह्याचा मृत्युदर १.५५
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १७.६८
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण १३,४२१
बरे झालेले रुग्ण ११,८३८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण १,३३८
होम आयसोलेशन ०