परवानगीच्या भानगडीत न पडताच उडवताहेत लग्नाचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:25+5:302020-12-23T04:26:25+5:30
लग्नासाठी नियमावली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकतात. सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क ...
लग्नासाठी नियमावली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळेस लग्न समारंभाच्या ठिकाणी ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकतात. सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे अनिवार्य, मानवी संपर्कात येणाऱ्या वस्तूंना सॅनिटाइज करणे, आजारी व्यक्तींना लग्नसमारंभात प्रवेश देऊ नये, आलेल्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग आवश्यक, आलेल्या व्यक्तींनी हात स्वच्छ धुऊनच प्रवेश करणे, ज्येष्ठ व लहान मुलांचा प्रवेश टाळावा, असे विविध नियम घालून दिले आहेत.
ई-परवानगीसाठी
माेठी कसरत
n शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अथवा परवानगी घेऊन लग्न लावणे म्हणजे पर्वत उचलून आणण्यासारखे आहे, अशी वधुपित्यांची भावना आहे.
n लग्नसोहळ्यासाठी परवानगीच घ्यायची म्हटले तर पोलीस ठाणे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे खेटे मारावे लागतात. त्यांनी दिलेल्या नियमांची यादी वेगळीच असते. ती पाळणे दिव्यच आहे.
अनेक राजकीय कार्यक्रम हे हजारो लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. तर त्या ठिकाणी कोणी विचारतही नाही. त्याला कुणाच्या परवानगीचीही गरज नसते. मुला, मुलीचे लग्न हा पित्याच्या आयुष्यातील मोठा आनंदाचा क्षण असतो. तेथे नाहक नियम लावतात. यातून सूट दिली पाहिजे.
- शिवाजी करंडे, वधूपिता
कोरोनात लग्न तारीख काढूनही लग्न थांबवावे लागले. आता शिथिलता दिली तर शंभर अटी टाकल्या जात आहेत. इतर कार्यक्रमांना होणारी गर्दी लक्षात घेता शासनाचे हे धोरण चुकीचे आहे. पुढाऱ्यांना वेगळा व सामान्यांना वेगळा न्याय नसावा.
- संजय कोटकर, सामाजिक कार्यकर्ता