‘श्रीं’चे औंढ्यात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:10 AM2018-07-02T01:10:22+5:302018-07-02T01:11:01+5:30
नगरीमध्ये पंचक्रोषितील भाविकांसह ग्रामस्थांनी पंढरपुरकडे जाणाऱ्या श्री गजानन महाराज शेगाव पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : नगरीमध्ये पंचक्रोषितील भाविकांसह ग्रामस्थांनी पंढरपुरकडे जाणाऱ्या श्री गजानन महाराज शेगाव पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
नागनाथ मंदिर प्रांगणात श्रींचे खा.अॅड. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफेसह नागनाथ संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड, नायब तहसीदार वैजनाथ भालेराव, संस्थान विश्वस्त गजानन वाखरकर, गणेश देशमुख, डॉ. पुरूषोत्तम देव, शिवाजी देशपांडे यांच्यासह नंदकुमार पाटील यांच्या कुटूंबाने श्रींचा आशीर्वाद घेतला. वारकºयांसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अॅड. बाबा नाईक, ज्ञानेश्वर जाधव, डॉ. विलास खरात, वैजनाथ पवार, प्रकाश पोले, बालाजी हांडे, संदीप गोबाडे, राजू कुलकर्णी, शाम कदम, रामू कदम आदी मान्यवरांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेवून दर्शनाचा लाभ घेतला. औंढा नागनाथ न.प.च्या वतीने नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, उपाध्यक्षा अलका कुरवाडे आदींनी पालखीची विधीवत पूजा केली. ३ तास पालखीचा मुक्काम येथे असताना पंचक्रोशितील बहुसंख्य भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.