जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:20 AM2019-02-12T00:20:26+5:302019-02-12T00:20:48+5:30
कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
जिल्हा परिषदेत जवळपास ५६ लाखांची अग्रीम उचलल्यानंतर त्याचे समायोजन सादर न केल्याचा मुद्दा गाजत आहे. यात सहा विभागांचा समावेश असून हे सर्वच मोठे विभाग आहेत. याबाबत सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी कोषागार कार्यालयास पत्र देऊन अग्रीम समायोजनाशिवाय अशा विभागांची देयके काढू नयेत, असे सांगितले. त्यामुळे या विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन रखडले आहे. याचे खापर वित्त विभागावर फोडून कर्मचाºयांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. त्यानंतर आज सीईओ तुम्मोड यांनी आपल्या पूर्वीच्या पत्राला स्थगिती दिली. त्यामुळे कर्मचाºयांचे वेतन अदा होणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी सांगितले. तर आता अग्रीम समायोजन न करणाºया विभागप्रमुख व संबंधित लिपिकाचेच तेवढे वेतन थांबविले जाणार आहे. अन्यथा त्यांच्या वेतनातून दरमहा दहा हजारांपर्यंतची कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षण विभागाची सर्वांत मोठी ३६ लाखांची रक्कम आहे. त्यातही अपंग कर्मचाºयांना स्कूटरच्या रक्कमेचेच २२ ते २५ लाख आहेत. अनेक दिवसांनंतर शिक्षण विभागाने ही संचिका धुंडाळली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंगल यांच्या काळात ४३ अपंग कर्मचाºयांना एकाच वेळी याचा लाभ दिला होता. नंतर पुन्हा काहींचा आदेश निघाला होता.
यात प्रत्येक कर्मचाºयाला ५0 हजारांची रक्कम दिली होती.
औंढा-२, वसमत-१४, सेनगाव-६, हिंगोली-१२ तर कळमनुरी तालुक्यातून ९ जणांना लाभ मिळाला होता.