IAS Success Story: आधी MBBS, नंतर IPS आणि अखेर IAS, पाहा पंकज यादव यांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:10 PM2021-03-02T12:10:31+5:302021-03-02T12:13:15+5:30
success story of IAS topper Pankaj Yadav who clears UPSC exam in 2019 in his third attempt : गावातील सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या पंकज यादव यांनी आजवर अनेकदा मोठं यश मिळवलं आहे....
Success Story Of IAS Topper Pankaj Yadav: स्वत:वर विश्वास असला तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं म्हटलं जातं. मेहनत आणि प्रयत्न हे यशासाठी महत्त्वाचे असतात. हरयाणामध्ये राहणारे पंकज यादव हे यापैकीच मोठं उदाहरण आहेत. पंकज यादव हे रेवाडी जिल्ह्यातील छोट्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण हे त्याच ठिकाणच्या सरकारी शाळेतून झालं. तर त्यांनी रेवाडी येथूनच आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं.
पंरतु पंकज यादव यांनी स्वत:च्या मेहनीच्या जोरावर यशाची शिखरं गाठलं. पंकज यादव यांनी सर्वप्रथम एमबीबीएस MBBS, त्यानंतर आयपीएस IPS आणि त्यानंतर आयएएस IAS ही पदं मिळवून स्वत:ला सिद्ध केलं आहे. दिल्ली नॉलेज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडला आहे.
ज्या प्रमाणे शहरातील मुलांना सुखसुविधा मिळतात त्याप्रमाणे आपल्याला त्या तितक्या प्रमाणात मिलाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंकज यांनी सरकारी शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी काही करण्याचा निश्चय केला. आपण अशा कोणत्यातरी क्षेत्रात जावं ज्या ठिकाणी आपल्याला तरूणांना मदत करता येईल असं त्यांनी ठरवलं. यानंतर त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षा देण्याचा निर्णय गेतला.
त्यांनी आपल्या पहिल्या प्रयत्नापासून अखेरच्या प्रयत्नापर्यंत तयारी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. परंतु त्यांना आपल्या मनासारखं पद हे तिसऱ्या प्रयत्नात मिळालं. पहिल्या प्रयत्नात ते मुलाखतीच्या राऊंडपर्यंत पोहोचले, परंतु त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर पूर्वीच्या परीक्षेतून शिकून त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली. यावेळी त्यांना ५८९ वा रँरक मिळाला. त्यावेळी त्यांना आय़पीएस सेवा मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा पंकज यांनी परीक्षा दिली आणि ५६ वा क्रमांक पटकावला. तसंच यानंतर त्यांची आयएएस या पदासाठी निवड झाली.
कसा होता अनुभव?
जर स्वत:वर विश्वास असेल तर कोणत्याही उमेदवाराची पार्श्वभूमी त्याच्या मार्गातील अडथळा बनू शकत नाही. आपल्याकडे काय आहे किंवा नाही याकडे कधीच लक्ष देऊ नये. केवळ आपल्याला ध्येय गाठायचं आहे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासोबत योग्य मार्गदर्शन मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं.
जर तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करणारं नसेल तर घाबरून न जाता इंटरनेटची मदत घेतली पाहिजे. आजकालच्या जमान्यात सर्व समस्यांचं निराकरण हे इंटरनेटकडे आहेत. या ठिकाणी तुम्ही परीक्षेचं पॅटर्न, गेल्या वर्षीचे पेपर, टॉपर्सच्या मुलाखती पाहू शकता आणि आपल्या आयुष्यात त्याचा उपयोगही करून घेऊ शकता असा सल्लाही पंकज यांनी दिला.