Afghanistan: अफगाणिस्तान सीमेवर 10,000 ISIS दहशतवादी घात लावून बसलेत; रशियाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:21 PM2021-09-12T14:21:09+5:302021-09-12T14:22:58+5:30

ISIS terrorist on Afghanistan Border: मध्य आशियातील छोटे छोटे देश अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान (Taliban) राज येण्यावरून भितीच्या छायेखाली आहेत. या देशांना पुन्हा दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांची वाढ होण्याची भीती वाटू लागली आहे.

10,000 ISIS terrorists on the Afghan border; Russia's warning after Taliban capture | Afghanistan: अफगाणिस्तान सीमेवर 10,000 ISIS दहशतवादी घात लावून बसलेत; रशियाचा इशारा

Afghanistan: अफगाणिस्तान सीमेवर 10,000 ISIS दहशतवादी घात लावून बसलेत; रशियाचा इशारा

Next

मॉस्को : अफगाण-तालिबानच्या (Afghanistan) धोक्यामुळे ताजिकिस्तानातील सैन्य तळांवर अद्ययावत रणगाडे पाठविण्याची घोषणा करणाऱ्या रशियाने मोठा इशारा दिला आहे. मध्य आशियाई देश ताब्यात घेण्याच्या उद्देशाने अफगाणिस्तानच्या सीमेवर 10000 हून अधिक आयएसआयएसचे दहशतवादी घात लावून बसले असल्याचे रशियाने म्हटले आहे. या दहशतवाद्यांचा सर्वात मोठा धोका हा उज्बेकिसतान आणि ताजिकिस्तानला आहे. (ISIS terrorist on Afghanistan Border; Russia warn to Tajikistan.)

Afghanistan: तालिबानसोबत युद्धाची तयारी? रशिया ताजिकिस्तानमध्ये 30 अत्याधुनिक रणगाडे पाठविणार

मध्य आशियातील छोटे छोटे देश अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान (Taliban) राज येण्यावरून भितीच्या छायेखाली आहेत. या देशांना पुन्हा दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांची वाढ होण्याची भीती वाटू लागली आहे. रशियाचे सिक्युरिटी काऊंसिलचे डेप्युटी चेअरमन दमित्री मेदवेदेव यांनी गॅजेट डॉट रशियामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले की, गुप्तचर यंत्रणांनुसार मध्ये आशियाई देशांना लागून असलेल्या अफगाण सीमेवर 10000 हून अधिक आयएसआयएसचे दहशतवादी आणि त्यांना फ़ॉलो करणारे लोक थांबलेले आहेत. आयएसआयएसला या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, हे त्यांनीच खुलेआम सांगितलेले आहे.

तालिबान राजमध्ये दहशतवाद्यांचे सरकार बनल्यानंतर अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद वाढविण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी केला जाऊ शकतो अशी भीती आशियाई देशांना वाटू लागली आहे. एवढेच नाही तर शस्त्रास्त्रांची, अंलमी पदार्थांची तस्करी यामुळे आजुबाजुच्या देशांमध्ये गुन्हेगारी वाढण्याची देखील भीती वाटत आहे. हा धोका पाहून सीआयए चीफ विलियम बर्न्स पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी आयएसआय प्रमुखाची भेट घेतली होती. 

ताजिकिस्तानने आपल्या 1,344 किमी लांब अफगाणिस्तानसोबतच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत. ताजिकीस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमली रहमोन यांनी आपल्या देशात कट्टरतावाद्यांवर कठोर करवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ताजिकिस्तानची आणि अफगाणिस्तानची सीमा 1344 किमी आहे. यातील अधिकतर डोंगररांगा आहेत जिथे लक्ष ठेवणे कठीण आहे. 

Web Title: 10,000 ISIS terrorists on the Afghan border; Russia's warning after Taliban capture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.