बांगलादेशात अमली पदार्थविरोधी कारवाईत १०५ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:18 AM2018-05-30T05:18:15+5:302018-05-30T05:18:15+5:30

अमली पदार्थांच्या विरोधात बांग्लादेशाने धडक मोहीम उघडली असून, सोमवारी रात्री घातलेल्या धाडींमध्ये १२ अमली पदार्थ विक्रेते ठार झाले

105 dead in anti-tobacco action in Bangladesh | बांगलादेशात अमली पदार्थविरोधी कारवाईत १०५ ठार

बांगलादेशात अमली पदार्थविरोधी कारवाईत १०५ ठार

googlenewsNext

ढाका : अमली पदार्थांच्या विरोधात बांग्लादेशाने धडक मोहीम उघडली असून, सोमवारी रात्री घातलेल्या धाडींमध्ये १२ अमली पदार्थ विक्रेते ठार झाले. पंधरवड्यापासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १0५ विक्रेते ठार झाले आहेत.
नऊ जिल्ह्यांत सोमवारी रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत धाडी टाकण्यात आल्या. मेथाम्फेटामाइन व कॅफिन या घटकांचा समावेश असलेल्या याबा या अमलीपदार्थाच्या गोळ््यांची बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. या गोळ््या अतिशय स्वस्त असून त्यामुळे त्याचे व्यसन करणे अनेकांना खिशाला परवडते.
त्या देशाला याबा व अन्य अमली पदार्थांच्या व्यसनाने घेरले असल्याने त्या विरोधात धडक मोहीम उघडण्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी १५ मे रोजी केली होती. अमली पदार्थांची तस्करी संपूर्णपणे बंद होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहील, असे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी म्हटले आहे.
बांग्लादेशात अमली पदार्थांची निर्मिती होत नाही. म्यानमारमधून तेकनफमार्गे बांगलादेशात याची तस्करी होते. पण आजवर काहीही कारवाई झाली नव्हती. मग आता अचानक असे काय घडले की ही कारवाई सुरू केली, असा सवालही विचारला जात आहे.

Web Title: 105 dead in anti-tobacco action in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.