बापरे! 'ती' कोमातून बाहेर आली आणि दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागली; डॉक्टरही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 01:27 PM2021-11-03T13:27:01+5:302021-11-03T13:41:07+5:30
कोमातून काही दिवसांनी बाहेर आलेली एक तरुणी चक्क दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागल्याची घटना घडली आहे.
प्रत्येकाच्या जीवनात हे चढ-उतार येत असतात. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही घटना या मनावर कोरल्या जातात आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्यच बदलतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कोमातून काही दिवसांनी बाहेर आलेली एक तरुणी चक्क दुसऱ्याच देशाची भाषा बोलू लागल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी कधीही या देशात गेली नव्हती तसेच तिला तेथील भाषेविषयी देखील माहिती नव्हती. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.
अमेरिकेतील एका तरुणीचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर ती काही वेळ कोमात गेली होती. मात्र जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती भलतीच भाषा बोलू लागली. यामुळे डॉक्टर देखील आता गोंधळात पडले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय समर डियाज या मुलीचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या डोक्यासह खांद्याला जबर मार लागला होता. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अपघातानंतर ती दोन आठवडे कोमामध्ये होती. आपला अपघात कसा झाला याबाबत तिला आता काहीही आठवत नाही.
डॉक्टरांनादेखील बसला धक्का
दोन आठवड्यांनंतर कोमातून बाहेर आल्यानंतर सुरुवातीला ती बोलू शकली नाही. मात्र, जेव्हा तिचा आवाज परत आला तेव्हा तिच्यासह डॉक्टरांनादेखील धक्का बसला. समर अचानक वेगळ्याच भाषेत बोलू लागली, तिची भाषा ऐकून रुग्णालयामधील सर्व कर्मचारी आश्चर्यचिकित झाले होते. ती रुग्णालमध्ये कोमात असताना कोरोनाच कहर पाहायला मिळाला. त्यामुळेच कोणी तिला भेटायला देखील आलं नव्हतं. मात्र त्यानंतर ती शुद्धीत आल्यावर तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
डॉक्टरांनी पुढील तपासणी केल्यानंतर समरला फॉरेन एक्सेंट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome) झाल्याचं निष्पन्न झालं. फॉरेन एक्सेंट सिंड्रोम ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागते. विशेष म्हणजे त्या भाषेचा आणि तिचा पूर्वी कधीही संबंध आलेला नसतो. समर डियाजच्या बाबतीमध्ये हेचं झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.