श्रीलंकेत दोन दहशतवाद्यांसह 15 ठार; सुरक्षा दलाची शोधमोहिम तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 09:04 AM2019-04-27T09:04:37+5:302019-04-27T09:19:56+5:30
श्रीलंकेच्या पूर्व प्रांतातल्या अंबारईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत.
कोलंबो : श्रींलंकेती साखळी बॉम्बस्फोटानंतर आज रात्री आणखी तीन बॉम्बस्फोट झाले. यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये आयएसआयएसच्या दोन जणांसह 15 दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी आणखी काही ठिकाणी बॉम्बहल्ले करण्याच्या तयारीत होते.
श्रीलंकेच्या पूर्व प्रांतातल्या अंबारईत तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. अंबारईच्या साइंदमरदू भागात काही जणांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी दिली. एका संशयितानं कलमुनाईत एका इमारतीत बॉम्बस्फोट घडवला.
AFP quoting Sri Lanka Police: 15 killed in raid on Islamist hideout
— ANI (@ANI) April 27, 2019
साइंदमरदूमध्ये सुरक्षा दलावर गोळीबार झाल्यानंतर, बॉम्बस्फोटाच्या आवाजानं परिसर हादरल्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार असलेल्या जहरान हाशिमच्या कट्टाकुंडी गावातील प्रत्येक घरात जाऊन पोलीस तपास करत आहेत. या दरम्यान पोलिसांनी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटकं ताब्यात घेतली. यावेळी पोलिसांना आयसिसचा बॅनर आणि पोशाखदेखील सापडला. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तीन बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी सर्वच भागातील सुरक्षा वाढवली आहे. पहाटे 4 पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
AFP: Sri Lanka troops kill two suspected IS gunmen, says official
— ANI (@ANI) April 27, 2019
ही कारवाई कोलंबोपासून 325 किमी दूर अअसलेल्या समंथुरईमध्ये करण्यात आली आहे. श्रीलंकेने 10 हजार जवान या शोधमोहिमोसाठी तैनात केले आहेत.
ईस्टर संडेला चर्च आणि हॉटेलबाहेर 8 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 253 जण ठार झाले होते.