एकाच दिवसात १६ वेळा नववर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:47 AM2017-12-30T03:47:18+5:302017-12-30T03:47:27+5:30
वॉशिंग्टन : जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावरील सहा अंतराळवीर एक अनोखी अनुभूती घेणार आहेत.
Next
वॉशिंग्टन : जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावरील सहा अंतराळवीर एक अनोखी अनुभूती घेणार आहेत.
४०२ किमी उंचीवर असलेला हा तळ दर ९० मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा करत असल्याने या अंतराळवीरांना सरत्या वर्षाचा सूर्यास्त आणि नववर्षाचा सूर्योदय (एकाच दिवसात) १६ वेळ पाहता येणार आहे. तळावर अमेरिकेचे तीन, रशियाचे दोन व जपानचा एक अंतराळवीर आहे.
सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवडा ते हलके काम करून व कुटुंबांशी संवाद साधून व्यतीत करतील. (वृत्तसंस्था)