पाकिस्तानच्या तुरुंगातून २० भारतीय मच्छीमारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:30 AM2020-01-07T05:30:41+5:302020-01-07T05:30:45+5:30
भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावपूर्व संबंध असताना सदिच्छेच्या भावनेतून सोमवारी पाकिस्तानच्या तुरुंगातील २० भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली.
Next
लाहोर : भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणावपूर्व संबंध असताना सदिच्छेच्या भावनेतून सोमवारी पाकिस्तानच्या तुरुंगातील २० भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली. पािकस्तानी रेंजर्सनी या मच्छीमारांना वाघा सरहद्दीवर सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. यातील बव्हंशी आंध्र प्रदेशचे आहेत. सिंध प्रांतातील जिल्हा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हे मच्छीमार रविवारी ट्रेनने लाहोरला आले होते. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. अजून २०० भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, असे तुरुंग अधीक्षकांनी सांगितले.