दोन प्रवासी विमानांची धावपट्टीवर टक्कर, पंखे झाले नेस्तनाबूत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 06:59 PM2017-08-03T18:59:33+5:302017-08-04T21:25:15+5:30
इंडोनेशियाच्या मेडन शहरात धावपट्टीवर उतरत असताना दोन विमानांची टक्कर झाली आहे
जकार्ता, दि. 3 - इंडोनेशियाच्या मेडन शहरात धावपट्टीवर उतरत असताना दोन विमानांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत दोन्ही विमानांचे पंखे तुटले आहेत. लायन एअरलाइन्सचं बोइंग विमान हे धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यांची विंग्स एअरक्राफ्टच्या विमानाला धडक बसली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, दोन्ही विमानांचे पंखे तुटले आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी या अपघाताचा तपास करत आहेत.
या आधी एप्रिल महिन्यात भारतातील दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला होता. दोन विमाने समोरासमोर आल्याने टक्कर होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) वेळीच संपर्क साधल्याने अपघात होता होता टळला.
याआधीदेखील गतवर्षी 27 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी इंडिगो आणि स्पाईसजेटच्या विमानांची टक्कर होऊन अपघात होणार होता. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक घटना दिल्ली विमानतळावर घडल्या असून विमानतळ व्यवस्थापन यावर अंकूश ठेवण्यात असमर्थ ठरला आहे.
विमानांवरून का हटत नाही गुलामगिरीचे प्रतीक VT
तुम्ही कोणत्याही भारतीय विमानात चढता तेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरवर नजर अवश्य जाते. हा नंबर VTने सुरू होतो. ज्यांना व्हीटीचा अर्थ माहीत नसतो, ते सर्वसाधारणपणे त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र ज्यांना त्याचा अर्थ माहीत असतो त्यांच्या मनात प्रत्येक वेळी प्रश्न उपस्थित होतो की गुलामीचे हे प्रतीक आम्ही कुठवर वाहून नेत राहणार? या VT चा अर्थ होतो ‘व्हाईसराय टेरिटरी’ म्हणजे व्हाईसरायचा भूभाग. भारतीय विमानांच्या नोंदणीक्रमांकात VT नंतर डॅश आणि नंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आपल्या मापदंडानुसार तीन अक्षर जोडत असते. चित्र बघा. त्यात एअर इंडियाच्या विमानाला VT-ALA हा नोंदणी क्रमांक दिला आहे. भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश शासकाला व्हाईसराय संबोधले जात होते. त्यांच्या अधिपत्याखालील भूभागात विमानांना त्यावेळी हा रजिस्ट्रेशन कोड दिला जायचा. त्यावेळी भारताकडे नोंदणीसाठी नवा कोड मिळविण्याचा पर्याय होता, मात्र भारताने असे केले नाही. पाकिस्तानने मात्र AP हा नवा कोड मिळविला. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या सर्वच देशांनी नवा कोड मिळविला, हे उल्लेखनीय.