इस्लामाबाद : अमेरिकेकडून मिळणारी लष्करी मदत कमी झाल्यामुळे पाकिस्ताननने यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठीची तरतूद तब्बल २0 टक्क्यांनी वाढवली आहे. सतत भारताविरुद्ध कागाळ्या करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षात भारताचीच भीती वाटते. त्यामुळेच संरक्षण खात्यासाठी यंदा जादा पैशांची तरतूद करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीकडेही पाकिस्तानचे बारीक लक्ष आहे. पाकिस्तानची नेहमीच पाठराखण करणारा चीन गेल्या काही काळापासून भारताशी मैत्री वाढवू पाहत आहे. त्यामुळेही पाकिस्तानमधील सत्ताधाºयांत खूपच अस्वस्थता आहे.स्वत:चे आर्थिक हितसंबंध टिकवण्यासाठी आणि अमेरिकेशी व्यापारी संबंध सध्या तणावाचे असल्याने चीनने भारताशी दोस्तीची भूमिका घेतली, हे स्पष्ट असले तरी पाकिस्तानी नेत्यांची त्यामुळे चिंता वाढली आहे.शिवाय पाकिस्तान सरकार व तेथील लष्कर यांच्यात सतत तणाव असतो. लष्कराचा तेथील सरकारवर दबाव असतो. पाकिस्तान सरकारने भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणे तेथील लष्कराला व गुप्तचर यंत्रणेला कधीच मान्य नसते.मात्र पाकिस्तानने आपल्या संरक्षणासाठीची तरतूद वाढवणे यांत आश्चर्य वाटण्याचे वा भारतासाठी चिंतेचे कारण नाही, असे संरक्षण क्षेत्राीत ल तज्ज्ञांना वाटते. (वृत्तसंस्था)
पाकच्या संरक्षण खर्चात २0% वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:38 AM