(प्रातिनिधिक छायाचित्र)
ऑस्ट्रेलियात तीन वर्षीय चिमुकल्याच्या रेस्क्यूचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाने घनदाट जंगला तीन दिवस आणि तीन रात्री एकट्याने काढल्या. ही बातमी समोर आली तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलीस आणि बचाव दलाची नजर जेव्हा या मुलावर पडली तेव्हा तेही हैराण झाले. एंथनी नावाच्या या मुलाच्या शरीरावर केवळ एक टी-शर्ट आणि नॅपी पॅंट होती. त्याला अखेरचं सिडनीपासून साधारण १४० किमी अंतरावर असलेल्या एका फॅमिली कॉटेजमध्ये बघण्यात आलं होतं.
ऑटिज्मने ग्रस्त आहे मुलगा
या मुलाला विसरण्याचा आजार म्हणजे ऑटिज्मची समस्या आहे. बचाव दलासमोर त्याच्या आजारामुळे एक आव्हान होतं. असं असूनही एका बचाव पथकाने मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. मुलाच्या घरचे लोकही मुलाच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. त्यांचं म्हणणं होतं की, भविष्यात ते मुलाला त्यांच्यापासून दूर होऊ देणार नाही. (हे पण वाचा : वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...)
हेलीकॉप्टरमधून दिसला मुलगा
सर्वांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे या चिमुकल्याला सर्वातआधी हेलीकॉप्टरमध्ये बसलेल्या लोकांना दिसला. त्यावेळी तो एका नाल्यातील पाणी पित होता. त्याच्या शरीरावर काही खरचटलं आणि मुंग्या चावल्याचेही निशाण दिसले. आश्चर्याची बाब म्हणजे जंगलात तीन दिवस राहूनही एंथनी चांगल्या स्थितीत होता. लोक या गोष्टीने हैराण झाले की, रात्री जंगलात तापमान कमी होऊन केवळ ६ डिग्री होतं.
एंथनी मिळाल्यावर लगेच NSW पोलीस फोर्सने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, 'बेपत्ता मुलगा काही वेळापूर्वीच सापडला. सध्या तो पूर्णपणे फीट आणि सुरक्षित दिसत आहे. तरीही मेडिकल टीम त्याला तपासात आहे'.
मुलाच्या वडिलांनी एंथनी सापडल्यावर आनंद व्यक्त केला की, हा चमत्कारच आहे की, त्यांचा मुलगा एक घनदाट जंगलात अशाप्रकारे तीन दिवस राहिला. ते म्हणाले की, जसा त्याने त्याच्या आईचा आवाज ऐकला तेव्हा त्याने डोळे उघडले आणि आईला बिलगून पुन्हा झोपला. या रेस्क्यू ऑपरेशनची खास बाब म्हणजे जंगलाच्या ज्या भागात एंथनी होता तिथे पोलिसांनीही सर्च ऑपरेशन केलं होतं. पण त्यांना मुलगा सापडला नाही.