पाक सीमेवर ४०० मीटर बोगदा

By admin | Published: May 5, 2014 03:00 PM2014-05-05T15:00:44+5:302014-05-05T15:00:44+5:30

आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या साम्बा जिल्ह्यातील चिलियारी येथे पाकिस्तानातून भारतात येणारा आणखी एक बोगदा सापडला आहे.

400 meter tunnel on Pak border | पाक सीमेवर ४०० मीटर बोगदा

पाक सीमेवर ४०० मीटर बोगदा

Next

 सीमा सुरक्षा दलाची कारवाई : २0१२ मध्येही उघड झाली होती अशीच घटना

जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या साम्बा जिल्ह्यातील चिलियारी येथे पाकिस्तानातून भारतात येणारा आणखी एक बोगदा सापडला आहे. तो भारतीय सीमेच्या २३ मीटर आत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) यासंदर्भात पाकिस्तानकडे निषेध नोंदवला. 
बीएसएफ अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले की, घनदाट व लांब झाडेझुडपे साफ करीत असताना हा ३ बाय ३ फुटांचा बोगदा 
आढळून आला. 
यापूर्वी २८ 
जुलै २0१२ रोजी आढळून 
आलेल्या ४00 मीटर लांबीच्या 
बोगद्याला तो जोडलेला आहे. यासंदर्भात पाकिस्तानी रेंर्जसकडे निषेध नोंदवण्यात आलेला 
आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेनजीक खणण्यात आलेल्या या बोगद्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. भारतात घुसखोरी व तस्करी करण्याच्या इराद्याने पाकिस्तानातून भारतीय सीमेत तो खोदण्यात आला आहे. 
पाकिस्तानने मात्र आधीप्रमाणे याही वेळी याचा इन्कार केला आहे. (वृत्तसंस्था)

पाकची मुजोरी
च्पाकमधून भारतात खोदण्यात आलेल्या या बोगद्याचा छडा लावण्याचे प्रयत्न पाकिस्तानने वेळोवेळी हाणून पाडले आहेत. 
च्एका बीएसएफ अधिकार्‍याने सांगितले की, जेव्हा केव्हा आम्ही बोगद्याच्या वरून पाकिस्तानच्या दिशेने खोदकाम सुरू करतो, तेव्हा सीमेपलीकडून खोदकाम करणार्‍यांवर गोळीबार केला जातो व आम्हाला रोखले जाते. 
च्बीएसएफ महासंचालक या मुद्यावर पुढे काय कारवाई करायची ते ठरवतील, असेही हा अधिकारी म्हणाला.

Web Title: 400 meter tunnel on Pak border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.