दुबई : येमेनच्या साना या राजधानीच्या शहरावर शुक्रवारी रात्री सौदी अरबस्तानच्या नेतृत्वाखालील मित्रराष्ट्रांच्या फौैजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ कमांडरसह ५० हुथी बंडखोर ठार झाले.हुथी बंडखोरांच्या राजकीय शाखेचा प्रमुख सालेह-अल-सम्माद गेल्या आठवड्यातील हवाई हल्ल्यात मारला गेला होता. त्याच्या अंत्ययात्रेच्या काही तासआधी बंडखोरांच्या गृहमंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या इमारतीलहा हल्ला करण्यात आला असे वृत्त ‘अल अखबारिया’ व ‘अल अरबिया’ या सौदी वृत्तवाहिन्यांनी दिले.हुथी बंडखोरांना पराभूत करून येमेनमधील विधिवत निवडूनआलेले सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी सौदी अरबस्तानया संघर्षात पडले आहे.बंडखोरांना इराणचा छुपा पाठिंबा आहे. सौदीला लागून असलेला येमेनचा मोठा प्रदेश बंडखोरांच्या ताब्यात आहे. (वृत्तसंस्था)
सौदीच्या हवाई हल्ल्यात ५० हुथी बंडखोर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 4:36 AM