तीन दहशतवादी हल्ल्यांत ५३ ठार
By admin | Published: June 27, 2015 02:47 AM2015-06-27T02:47:51+5:302015-06-27T02:47:51+5:30
रमझानच्या पवित्र महिन्यातील शुक्रवारी इस्लामी दहशतवाद्यांनी युरोप आणि मध्य पूर्वेत केलेल्या हल्ल्यांमध्ये एकूण ५३ निरपराधांचे बळी गेले. पूर्व फ्रान्समधील एका गॅस कारखान्यात एका मुस्लीम
Next
पॅरिस : रमझानच्या पवित्र महिन्यातील शुक्रवारी इस्लामी दहशतवाद्यांनी युरोप आणि मध्य पूर्वेत केलेल्या हल्ल्यांमध्ये एकूण ५३ निरपराधांचे बळी गेले. पूर्व फ्रान्समधील एका गॅस कारखान्यात एका मुस्लीम दहशतवाद्याने हल्ला केला असून एका कर्मचाऱ्याचा शिरच्छेद करून त्याचे शिर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले.
ट्युनिशियातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका पर्यटनस्थळावर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी गोळीबार करून २७ जणांना ठार मारले आहे, तर कुवेत शहरातील मशिदीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असून त्यात २५ जण ठार झाले आहेत. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.