नवी दिल्ली : जगातील २000 बड्या कंपन्यांच्या यादीत यंदा भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. मात्र पहिल्या २00 कंपन्यांत रिलायन्स इंडस्टीज ही एकच भारतीय कंपनी आहे. या यादीत ६१ देशांतील कंपन्यांचा समावेश असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ५७५ कंपन्या अमेरिकेतील आहेत.
फोर्ब्सच्या यावर्षीच्या २000 जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या यादीत इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायना पहिल्या स्थानी आहे. या २000 कंपन्यांत एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इंडियन आॅइल, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एल अँड टी, स्टेट बँक एनटीपीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब तॅशनल बँक, बँक आॅफ बडोदा, कॅनरा बँक आदींचा समावेश आहे.