गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावलेल्या जेम्स वेब या सर्वात भव्य टेलिस्कोपद्वारा जुलैमध्ये पहिलेवहिले छायाचित्र प्रकाशित होणार आहे. छायाचित्र कसले असेल पाहू या...
जेम्स वेब काय आहे?जेम्स वेब टेलिस्कोप ही अवकाशात पाठवलेली सर्वात मोठी दुर्बीण आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या नासातर्फे तिचे लाँचिंग करण्यात आले होते. जेम्स वेब टेलिस्कोपच्या निर्मितीसाठी १० अब्ज डॉलर खर्च आला.
१२ जुलै रोजी टेलिस्कोप पहिलेवहिले छायाचित्र नासाकडे पाठवणार आहे.
काय असेल छायाचित्र?हबल दुर्बिणीने टिपलेल्या छायाचित्राहून कैकपटींनी मोठे असे हे छायाचित्र असेल. नासाच्या म्हणण्यानुसार जेम्स वेबकडून काढले जाणारे पहिले छायाचित्र आपल्या विश्वाचे सर्वात सखोल असे संभाव्य छायाचित्र असेल. या छायाचित्रातूनच जेम्स वेब टेलिस्कोपच्या मर्यादा स्पष्टहोणार आहेत.
पृथ्वीपासून दूर...जेम्स वेब टेलिस्कोप पृथ्वीपासून १६ लाख किमी लांब अंतरावर आहे. १४ अब्ज वर्षांपूर्वी तारे आणि आकाशगंगांमधून निघालेल्या पहिल्या प्रकाशाचा शोध ही दुर्बीण घेणार आहे. अवकाशात विहरणाऱ्या हबल दुर्बिणीची जागा ही सर्वशक्तिमान दुर्बीण घेणार आहे.