पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:15 PM2021-09-05T12:15:52+5:302021-09-05T12:17:41+5:30

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत."

Afghanistan panjshir claim resistance forces killed about 600 taliban Terrorist | पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

Next

काबूल - अफगाणिस्तानातील पंजशीरवरील कब्जावरून तालिबान आणि तालिबान्यांना विरोध करणाऱ्या फोर्सेसमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच आहे. शनिवारीदेखील येथे रक्तरंजित लढाई झाली. यात अनेक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. पंजशीरच्या इशान्येकडील प्रांतात सुमारे 600 तालिबानी मारले गेले असून 1,000 हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांनी गुडघे टेकल्याचा दावा विरोध करणाऱ्या गटाने दिला आहे. स्पुतनिकने अफगाणिस्तानमधील विरोध करणाऱ्या दलांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. (Afghanistan panjshir claim resistance forces killed about 600 taliban Terrorist)

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत."

अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्ष; वर्चस्वासाठी तालिबान-हक्कानी पेटले; गोळीबारात अब्दुल गनी जखमी

तालिबान विरोधी गटाने 600 तालिबान्यांना मारल्याचा दावा केला आहे. तर आम्ही पंजशीरच्या चार जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता बिलाल करीमी म्हणाला, "आम्ही पंजशीर प्रांतातील सात पैकी चार जिल्हे ताब्यात घेतले आहेत. आता आम्ही पंजशीरच्या दिशेने जात आहोत."

तालिबानला विरोध करणारा गट म्हणाला - आत्मसमर्पण नाही - 
तालिबानला विरोध करणाऱ्या गटाचे नेते अमरुल्ला सालेह यांनी, तालिबानने या भागावर कबजा केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, तालिबान्यांनी फोन, इंटरनेट आणि वीज बंद केल्याने परिस्थिती कठीण झाल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती सालेह म्हणाले, दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे. आम्ही कठीण परिस्थितीत आहोत, यात शंका नाही. आमच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला आहे. मात्र, आमचे सैन्य शरणागती पत्करणार नाही.
 

Web Title: Afghanistan panjshir claim resistance forces killed about 600 taliban Terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.