"सकाळी उठले तेव्हा शरीरावर कपडे नव्हते"; CCTV फुटेज चेक केल्यानंतर तिला धक्काच बसला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:17 PM2021-08-09T16:17:53+5:302021-08-09T16:26:58+5:30
चीनमधील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाने आपल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कंपनीमधील एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप ...
चीनमधील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाने आपल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कंपनीमधील एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॅनियल झांग यांनी सोमवारी सांगितले की, एका महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर एका मॅनेजरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी धोरणे देखील तयार केली जातील, असे कंपनीने म्हटले आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मॅनेजरनं तिला कंपनीच्या ट्रिपवर येण्यासाठी बळजबरी केली. तसंच, काही व्यक्तींशी भेट घडवतो असं खोटं सांगूनही फसवलं.
''२७ जुलैच्या संध्याकाळी झालेल्या मीटिंगमध्ये मला किस केलं होतं. त्यानंतर काय झालं हे नेमकं आठवत नव्हतं. सकाळी उठले तेव्हा मी हॉटेलच्या रुममध्ये होते. माझ्या शरीरावर कपडे नव्हते. संध्याकाळी काय झालं याची मला काहीच कल्पना नाही.'', असं संबंधित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. तिने जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा त्या दिवशी संध्याकाळी चार वेळा आरोपी मॅनेजर रुममध्ये येऊन गेल्याचं समजलं. हे पाहून तिला धक्काच बसला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, अलिबाबा ग्रुपमध्ये लैंगिक अत्याचारासारख्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असं कंपनीच्या प्रवक्त्याने निक्षून सांगितलं आहे. आमच्याकडे यासाठी 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देणं आमची जबाबदार असल्याची ग्वाहीही कंपनीने दिली आहे.