चीन-पाकचे लढाऊ विमान अमेरिकेच्या नाकावर टिच्चून उडणार; हा अमेरिकन देश खरेदीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:27 AM2021-09-20T09:27:01+5:302021-09-20T09:27:48+5:30

Argentina will rise tension in America: अर्जेंटिनाला लढाऊ विमाने खरेदी करण्यापासून गेल्यावेळी ब्रिटनने रोखले होते. यामुळे पुन्हा अर्जेटिंना लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे.

Amerian country Argentina likely to buy 12 JF-17 Thunder jets from Pakistan: report | चीन-पाकचे लढाऊ विमान अमेरिकेच्या नाकावर टिच्चून उडणार; हा अमेरिकन देश खरेदीच्या तयारीत

चीन-पाकचे लढाऊ विमान अमेरिकेच्या नाकावर टिच्चून उडणार; हा अमेरिकन देश खरेदीच्या तयारीत

Next

पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे JF-17 लढाऊ विमान बनविले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दक्षिण अमेरिकी देश अर्जेंटिना (Argentina) हे लढाऊ विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने काही मीडिया रिपोर्टच्या हवाल्याने अर्जेंटिना पाकिस्तानकडून 12 जेएफ-17 ए ब्लॉक-3 लढाऊ विमाने खरेदी करण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. अर्जेंटिना सरकारने त्यांच्या संसदेत 2022 च्या बजेटमध्ये 664 दशलक्ष डॉलर एवढा निधी राखीव ठेवला आहे. यानुसार अर्जेंटिना JF-17 खरेदी करणार असा दावा केला जात आहे. (Argentina plans to buy Pakistan's JF-17 Thunder fighter jets)

अर्थसंकल्पात निधीची तरतूद म्हणजे व्यवहाराला मंजुरी मिळाली असे होत नाही. अद्याप पाकिस्तान किंवा चीनसोबत अर्जेंटिनाने कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही. काही महिन्यांपूर्वी अर्जेंटिनाने हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी केले होते. 

अर्जेंटिनाला लढाऊ विमाने खरेदी करण्यापासून गेल्यावेळी ब्रिटनने रोखले होते. यामुळे पुन्हा अर्जेटिंना लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. 1982 मधील फॉकलंड युद्धानंतर ब्रिटनने अर्जेंटिनावर प्रतिबंध लावलेले आहेत. फॉकलंड बेटांवरून अमेरिका आणि अर्जेंटिनामध्ये युद्ध झाले होते. तेव्हा ब्रिटिशांच्या नौदलाने अर्जेंटिनाला हरवून बेटांवर कब्जा केला होता. 

अर्जेंटिनाने 2015 मध्ये स्वीडन आणि द. कोरियाकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ब्रिटनच्या दबावामुळे दोन्ही देशांनी यातून माघार घेतली. अर्जेंटिनाने स्वीडीश JAS 39 ग्रिपेन फायटर जेट्स खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांन दक्षिण कोरियाई FA-50 फायटिंग ईगलमध्ये स्वारस्य दाखविले होते. 

Web Title: Amerian country Argentina likely to buy 12 JF-17 Thunder jets from Pakistan: report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.