'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:43 PM2021-06-28T21:43:10+5:302021-06-28T21:46:33+5:30

न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर मॅगी हॅबरमॅन यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः ट्रम्प यांनाही वाटते, की ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात.

America Conspiracy theory that trump will be reinstated in august has officials worried | 'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन!

'ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रम्प होणार अमेरिकेचे राष्ट्रपती'; दाव्यानं वाढवलं ज्यो बायडेन सरकारचं टेन्शन!

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ज्यो बायडेन यांचा विजय होऊन ते राष्ट्रपती झाले आहेत. मात्र, आता रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प हे ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती होऊ शकतात, अशी अफवा अमेरिकेत पसरली आहे. या अफवेने होमलँड सिक्योरिटी विभागात चिंतेचे वातावरण आहे. (America Conspiracy theory that trump will be reinstated in august has officials worried)

माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑगस्ट महिन्यात राष्ट्रपती पद डोनाल्ड ट्रम्प यांना बहाल करण्याच्या विचित्र सल्ल्यानंतर, या कथित षडयंत्रामुळे तेथे खळबळ उडाली आहे. ही कल्पना सिडनी पॉवेल यांच्यासह माजी राष्ट्रपतींच्या जवळच्या लोकांनी आणली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर एका वकिलावर खटला चालवला जात आहे. या वकिलावर आरोप आहे, की त्याने ट्रम्प यांना व्होटिंग मशीन्सचे ऑपरेटर्स आणि व्हेनेझुएलातील कम्युनिस्ट नेत्यांच्या साथीने षडयंत्र रचून निवडणुकीत धोका दिला.

अरेरेsss! अब्जाधीश महिलेसोबतचा एक KISS मंत्र्याला महागात पडला; CCTVत कैद झाल्यानं राजीनामा द्यावा लागला!

न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर मॅगी हॅबरमॅन यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः ट्रम्प यांनाही वाटते, की ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात. मात्र, या मागचे कारण आणि हे कुठल्या आधारे होणार हे स्पष्ट नाही. एका अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तनुसार, या अफवेसंदर्भात वरिष्ठ काउंटर-इंटेलिजन्सचे अधिकारी जॉन कोहेन यांच्याशी एका खासगी चर्चेदरम्यान काँग्रेसच्या सदस्यांनी या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. 

ते म्हणाले, स्पष्टपणे करण्यात आलेल्या या भविष्यवाणीमुळे प्रचंड चिंता होती. कारण एक खोटी स्टोरी पसरविण्यात आली होती, की निवडणुकीत ट्रम्प यांच्यासोबत गडबड करण्यात आली. 

द इंडिपेंडंटला देण्यात आलेल्या निवेदनात, डीएचएस प्रवक्ता म्हणाले, "होमलँड सिक्योरिटी विभाग (डीएचएस) हिंसाचार आणि अतिरेकी विचारसरणींसह घृणास्पद आणि खोटे तथ्य यांच्यात काही संबंध आहे का? यवर लक्ष केंद्रित करत आहे. डीएचएस सोशल मिडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने केला गेलेला दुष्प्रचार, कटाचे सिद्धांत आणि अतिरेकी कथांपासून प्रेरित हिंसात्मक कृत्यांना रोखण्याची आपली क्षमता वाढवत आहे.

Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

Web Title: America Conspiracy theory that trump will be reinstated in august has officials worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.