Trump Plaza In Atlantic City Is Demolished : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांचा प्लाझा हजारो डायनामाइटच्या मदतीने पाडण्यात आला आहे. अमेरिकेतील अटलांटिक(Atlantic) शहरातील हा प्लाझा आपल्या कसीनोसाठी लोकप्रिय होता. ३ हजार डायनामाइटच्या मदतीने ३४ मजल्यांची ही इमारत पाडताना बघण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली होती.
हा प्लाझा १९८४ मध्ये बांधण्यात आला होता आणि २०१४ मध्ये याला बंद कऱण्यात आलं होतं. वादळांमुळे या इमारतीचा बाहेरचा भाग खराब झाला होता. ज्यामुळे गेल्यावर्षी जूनमध्ये मेअर मार्टी स्मॉलने ही बिल्डींग पाडण्याचा आदेश दिला होता. जेव्हा ही बिल्डींग पाडण्यात आली तेव्हा तिथे शेकडो लोक उपस्थित होते. इतकंच नाही तर याचं लाइव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आलं होत.
हा प्लाझा पाडतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३४ मजली ही विशाल इमारत पाडण्यासाठी केवळ २० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. बुधवारी सकाळी ९ वाजता एकापाठी एक विस्फोटानंतर ही इमारत पाडली गेली. अटलांटिक शहरचे मेअर म्हणाले की, इमारत पाडल्यानंतर याचा मलबा ८ मजली इमारती एवढा आहे आणि तो हटवण्यासाठी जून पर्यंतचा वेळ लागेल.
ट्रम्प स्वत: काही हॉलिवूड सिनेमात दिसले आहेत. त्यांचा हा प्लाझाही अनेक सिनेमात दिसला आहे. ओशन ११ सिनेमाचं शूटींग ट्रम्प प्लाझामध्ये करण्यात आलं होतं. १९८४ ते १९९१ पर्यंत या कसीनोचे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणारे बर्न डिल्लन म्हणाले की, 'ज्याप्रकारे ट्रम्प प्लाझा आणि अटलांटिक सिटीला जगसमोर ठेवलं तो क्षण अविश्वसनिय होता'. या प्लाझामध्ये पॉप सुपरस्टार मेडोनापासून ते रेसलर हल्क होगन, म्युझिक लिजंड कीथ रिचर्ड्स, अभिनेता जॅक निकलसनसारखे लोकही येऊन गेलेत.