तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये संघर्षाची व्याप्ती वाढत असताना अमेरिकी लोकप्रतिनिधींनी युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षा, शस्त्रे पुरविठ्यासाठी तब्बल ९५ अब्ज डॉलर्स मदत पॅकेज मंजूर केले आहे. शनिवारी पारित झालेल्या बहुप्रतीक्षित विधेयकाला पाठिंबा मिळाला आहे. यामुळे युक्रेनकडून रशियावर आणि इस्रायलकडून इराणवर आणखी हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे.
रशियाने हे पॅकेज घोषित करण्याला युक्रेनचा नाश होणार असून, अधिक मृत्यू होतील, असा इशारा दिला. तिकडे इराणनेही प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेत पुढे काय कारवाई करायची याचा आढावा घेतला. त्यामुळे तणाव आणखी वाढेल.
हल्ल्यात हिजबुल्लाहचे तीन सैनिक ठारइराण समर्थित हिजबुल्लाह गटाने सांगितले की, शनिवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायली हल्ल्यात त्यांचे तीन सैनिक मारले गेले. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून हमासच्या मित्रपक्षाने इस्रायली सैन्यावर दररोज सीमेपलीकडून गोळीबार केला आहे.
अमेरिकेने कोणत्या देशाला किती मदत दिली?
इस्रायल : २६.३८ अब्ज डॉलर्स५.२ अब्ज डॉलर्स : क्षेपणास्त्र आणि रॉकेट संरक्षण तसेच विस्तार३.५ अब्ज डॉलर्स : प्रगत शस्त्रे प्रणाली खरेदीसाठी१ अब्ज डॉलर्स : शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्यासाठी, ४.४ अब्ज डॉलर्स : इतर पुरवठा आणि सेवांसाठी९.२ अब्ज डॉलर्स : मानवतावादी सेवा
युक्रेन : ६०.९४ अब्ज डॉलर्स२३ अब्ज डॉलर्स : शस्त्रे, साठा आणि सुविधा पुन्हा भरण्यासाठी१२ अब्ज डॉलर्स : युक्रेन सुरक्षा साहाय्य उपक्रमासाठी११ अब्ज डॉलर्स : युक्रेनियन सैन्याची क्षमता वाढविण्यासाठी८ अब्ज डॉलर्स : सरकारला पगार देण्यास मदत करणार
तैवान : ८.१२ अब्ज डॉलर्सस्टिंगर अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांसारख्या यूएस शस्त्रास्त्रचा पुरवठा
मदतीचा असा झाला परिणाम
युक्रेन : मदतीचे पॅकेज घोषित होताच युक्रेनच्या विशेष फौजांनी शनिवारी रात्रभर ड्रोन्सच्या माध्यमातून रशियाच्या ८ ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात रशियाचे ३ ऊर्जा स्टेशन आणि इंधन डेपोंना आग लागली. या हल्ल्यात २ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियानेही हल्ला झाल्याचे मान्य करत युक्रेनच्या ५० ड्रोनला पाडल्याचा दावा केला आहे.
इस्रायल : इस्रायलने दक्षिणी गाझा शहर रफाहावर मोठा हल्ला केला. यामध्ये १८ मुलांसह २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने रफाहवर जवळपास दररोज हवाई हल्ले सुरू केले आहे. येथे गाझातील तब्बल २३ लाख लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. अमेरिकेसह इतर अनेक देशांनी संयम राखण्याचे आवाहन असूनही जमिनीवरून आक्रमण वाढविण्याचा निर्धार इस्रायलने कायम ठेवला आहे.