Joe Biden: अमेरिकन जनतेला काबुल सोडण्याचा बायडन यांचा निर्णय अमान्य! अप्रूव्हल रेटिंगनं वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 09:55 AM2021-09-03T09:55:33+5:302021-09-03T09:56:19+5:30

Joe Biden: अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना परराष्ट्र नितीवरुन मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.

america joe biden approval rating as president of us all time low after chaotic withdrawal of american troops | Joe Biden: अमेरिकन जनतेला काबुल सोडण्याचा बायडन यांचा निर्णय अमान्य! अप्रूव्हल रेटिंगनं वाढवलं टेन्शन

Joe Biden: अमेरिकन जनतेला काबुल सोडण्याचा बायडन यांचा निर्णय अमान्य! अप्रूव्हल रेटिंगनं वाढवलं टेन्शन

googlenewsNext

Joe Biden: अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबान्यांनी सत्ता काबीज केली आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना परराष्ट्र नितीवरुन मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. यातच अमेरिकन जनतेनं बायडन यांची अप्रूव्हल रेटिंग देखील कमी केली आहे. एनपीआर आणि पीबीएस न्यूशोअरसह एका नव्या मॅरिस्ट नॅशनल पोलनुसार अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची अप्रूव्हल रेटिंग ४३ टक्क्यांवर आली आहे. बायडन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतरची ही आतापर्यंतची सर्वात निच्चांकी रेटिंग आहे. बहुतांश अमेरिकन नागरिकांनी बायडन यांच्या परराष्ट्र नितीवर टीका केली आहे. यासोबत अमेरिकन जनतेनं अफगाणिस्तानात संयुक्त राज्यांची भूमिका फोल ठरल्याचंही मत व्यक्त केलं आहे. 

अफगाणिस्तानात आज सरकार स्थापन करणार तालिबान?, महिलांना संधी नाहीच!

५६ टक्के अमेरिकन जनतेनं बायडन यांच्या परराष्ट्र नितीला नाकारलं
नव्या पोलनुसार जवळपास ५६ टक्के अमेरिकन जनतेनं ज्यो बायडन यांच्या परराष्ट्र नितीच्या पद्धतीला नकार दिला आहे. मॅरिस्ट पोलनुसार प्रकाशित झालेल्या डेटामध्ये लक्षात येतं की अमेरिकेच्या ६१ टक्के जनतेनं अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघार घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात आहे. अफगाणिस्तानात वास्तविक काय व्हायला हवं होतं याबाबतची अमेरिकन जनता संभ्रामात असल्याचं पोलमधून समोर आलं आहे. पण जवळपास ७१ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानात अमेरिका सपेशल अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. या सर्व घटनेमुळे आणि सद्य परिस्थितीत अमेरिकेची प्रतिष्ठा खूप कमी झाली आहे, असं अमेरिकनं जनतेनं म्हटलं आहे. 

विशेष म्हणजे, ज्यो बायडन यांच्या नितीवर रिपब्लिकन देखील नाराज झाले आहेत. पोलनुसार ७३ टक्के रिपब्लिकन्सनं बायडन यांच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहेत. तर ६६ टक्के डेमोक्रॅट देखील बायडन यांच्या परराष्ट्र नितीवर असंतुष्ट आहेत.   

Web Title: america joe biden approval rating as president of us all time low after chaotic withdrawal of american troops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.