दोहा (कतार) - गेल्या १९ वर्षांपासून युद्धात होरपळत असलेल्या अफगाणिस्तानमध्ये शा्ंतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. दरम्यान, तालिबाने शांतता कराराचे पालन केल्यास येत्या १४ महिन्यांच्या आत अमेरिकाअफगाणिस्तानमधून आपल्या सर्व सैनिकांना माघारी बोलावेल, अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.
अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे आज हा ऐतिहासिक शांतता करार झाला. या कराराचे साक्षीदार होण्यासाठी ३० विविध देश आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर दोन्ही पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमधून माघारी हटल्यानंतर तालिबान सशस्त्र संधर्ष सोडून देईल, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील परदेशी सैनिकांच्या उपस्थितीवर तालिबानकडून तीव्र आक्षेप घेण्यात येत होता. आता अमेरिकन सैनिकांच्या माघारीच्या तयारीवरूनच हा करार झाला आहे.
करार झाल्यानंतर पहिल्या १३५ दिवसांत अमेरि्का आणि इतर देश आपल्या ८ हजार ६०० सैनिकांना माघारी बोलावतील. त्यानंतर पुढील १४ महिन्यांत सर्व अमेरिकी सैनिक मायदेशी परततील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार करताना सत्तेत आल्यावर अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळाला होता. ट्रम्य यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यावेळीही अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिकांच्या माघारीचा पुनरुच्चार केला होता.
संबंधित बातम्या
अमेरिका - तालिबान चर्चा भारतासाठीही महत्त्वाची!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन
अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार
अमेरिका आणि तालिबान यांच्यात गेले १९ महिने चाललेल्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो दोडा येथे झालेल्या करार प्रक्रियेमध्ये उपस्थित होते. तर अमेरिकेच संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि नाटोचे महासचिव जेन्स् स्टोलटेनबर्ग काबूल येथे उपस्थित होते.