ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 01:28 PM2018-05-24T13:28:14+5:302018-05-24T13:28:14+5:30

अमेरिकेच्या नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प जर त्यांचं ट्विट पाहण्यापासून थांबवत असतिल तर ते संविधानाचं उल्लंघन असेल.

american president donald trump can not block users twitter says newyork city court | ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश

ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश

googlenewsNext

न्यूयॉर्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर कुणालाही ब्लॉक करू शकत नाहीत. बुधवारी (23 मे) स्थानिक कोर्टाने तसा आदेश दिला आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणालाही ट्विटरवर ब्लॉक केलं तर ते संविधानाचं उल्लंघन असेल, असंही कोर्टाने म्हटलं. 2017मध्ये काही ट्विटर फॉलोअर्सने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने निकाल दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या युजर्सला ट्विटरवर ब्लॉक केल्यावर त्यांनी याचिका दाखल केली होती. 

अमेरिकेच्या नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प जर त्यांचं ट्विट पाहण्यापासून थांबवत असतिल तर ते संविधानाचं उल्लंघन असेल, असं फेडरल कोर्टाचे न्यायाधीश नाओमी रीस बुचवॉल्ड यांनी सांगितलं. सोशल मीडिया हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कुणालाही ब्लॉक करू शकत नाही. ट्विटवर कुठल्याही युजरला ब्लॉक करणं म्हणजे ते त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचं ते म्हणाले. 

एखाद्या मुद्द्यावर किंवा प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याला महत्त्व देतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. जर युजर्सच्या ट्विट किंवा रिट्विटमुळे तुमचं लक्ष विचलित होत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. युजरला ब्लॉक करणं उपाय नसून ते संविधानाचं उल्लंघन मानलं जाईल, असं कोर्टाने म्हटलं. 

Web Title: american president donald trump can not block users twitter says newyork city court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.