.. अन ओबामांना अश्रू अनावर झाले
By admin | Published: January 6, 2016 11:21 AM2016-01-06T11:21:09+5:302016-01-06T11:23:47+5:30
अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबारात मृत्यूमुखी पडलेली बालके व वाढत्या हिंसाचाराच्या घटनामुळे व्यथित झालेल्या बराक आबोमांना अश्रू अनावर झाले
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ६ - अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बेछूट गोळीबारामुळे काही लहानग्यांचा झालेला मृत्यू आणि वाढत्या हिंसाचाराच्या घटना यामुळे व्यथित झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात अश्रू अनावर झाले.
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबिय व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी बंदुकीमुळे होत असलेल्या हिंसाचाराबाबत ओबामा बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी अमेरिकेतील शस्त्रांच्या सहज उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली. ' बंदुकीच्या साहाय्याने होत असलेले हल्ले व त्यामुळे वाढणत जाणा-याहिंसाचारावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे, असे मत ओबामा यांनी व्यक्त केले. बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडलेल्या मुलांचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला त्या विचाराने वेडे व्हायला होते, असे सांगणा-या ओबामांच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत होते.
यावेळी ओबामांनी भविष्यात शस्त्र परवाने मिळविण्याचे नियम अधिक कडक करण्याविषयी सूतोवाच करत नागरिकांकडून शस्त्रास्त्रांचा होणारा वाढता वापर रोखण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
अमेरिकेत गेल्या काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून त्याच पार्श्वभूमीवर ओबामा यांनी चिंता व्यक्त केली.