मोर्सीविरुद्ध चालणार आणखी एक खटला

By admin | Published: September 7, 2014 02:16 AM2014-09-07T02:16:01+5:302014-09-07T02:16:01+5:30

इजिप्तचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांनी राष्ट्रीय हिताशी संबंधित कागदपत्रे कतारला दिल्याचा ठपका ठेवत सरकार त्यांच्या विरुद्ध आणखी एक खटला चालवणार आहे.

Another case against Morsi | मोर्सीविरुद्ध चालणार आणखी एक खटला

मोर्सीविरुद्ध चालणार आणखी एक खटला

Next
कैरो : इजिप्तचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांनी राष्ट्रीय हिताशी संबंधित कागदपत्रे कतारला दिल्याचा ठपका ठेवत सरकार त्यांच्या विरुद्ध आणखी एक खटला चालवणार आहे. लष्कराने जुलै 2क्13 मध्ये मोर्सी यांना पदच्युत केल्यापासून इजिप्त व कतार यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. देशात वर्षभर झालेल्या आंदोलनानंतर मोर्सी यांना पदावरून हटविण्यात आले होते. कतारचा मुस्लिम ब्रदरहूड या मोर्सीसमर्थक संघटनेला पाठिंबा आहे. जुलै 2क्13 पासून मोर्सी हे तुरुंगात आहेत. मोर्सीविरुद्ध सुरू असलेल्या अनेक खटल्यांपैकी एकामध्ये त्यांना फाशीची शिक्षाही झाली आहे. दरम्यान, मोर्सी यांनी न्यायालयांना बेकायदेशीर ठरविले आहे. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Another case against Morsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.