नवी दिल्ली: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार यंदा तिघांना जाहीर झाला आहे. आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येईल. या तिन्ही वैज्ञानिकांनी लेजर तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमूल्य संशोधन केलं. त्यांच्या या कार्याचा गौरव नोबेल पुरस्कारानं करण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सकडून नोबेल पुरस्काराचे मानकरी निश्चित केले जातात. एक नोबेल पुरस्कार जास्तीत जास्त तीन वैज्ञानिकांना विभागून दिला जाऊ शकतो, असा नियम आहे. त्यामुळे आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो आणि डोना स्ट्रिक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येईल. गेल्या वर्षीदेखील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आला होता. हे तिन्ही वैज्ञानिक अमेरिकेचे होते.
आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 6:59 PM