काठमांडू: नेपाळमधूनअपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी बारा येथे बस अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. एकट्या हेटौडा रुग्णालयात 12 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
सोमवारीही बस अपघातात दोघांचा मृत्यू झालायाआधी सोमवारी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर 36 जण जखमी झाले होते. ही घटना पूर्व-पश्चिम महामार्गावरील हेटौडा उपमहानगरी-15 मधील चुरियामाई मंदिराजवळ घडली होती. रात्री बस काठमांडूहून झापाकडे जात होती. या घटनेत इतर सहा जण गंभीर जखमी झाले, त्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारानंतर भरतपूर आणि काठमांडू येथील रुग्णालयात हलवण्यात आले.