इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. दरम्यान, पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदूमंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये ननकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक झाली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात सिंध प्रांतामध्ये एका हिंदू मंदिरावर हल्ला करून कट्टरपंथीयांनी मोडतोड केली होती. या संबंधीची छायाचित्रे पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर शेअर केली आहेत. ''सिंध प्रांतात अजून एका हिंदू मंदिराची मोडतोड करण्यात आली आहे. थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. अशा घटनांबाबतचे वृत्त नेहमी वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असते. दरम्यान सिंधू प्रंतामध्ये हिंदू तरुणींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याच्या काही घटनासुद्धा घडल्या आहेत.
पाकिस्तानात अजून एका हिंदू मंदिरावर हल्ला, मूर्तीची केली विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:21 AM
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.
ठळक मुद्देपाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना थारपरकारमधील चाचरो येथे जमावाने माता राणी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केली आहे