अबब! विरूष्काच्या वेडिंग प्लेसची एका दिवसाची किंमत वाचून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 09:01 AM2017-12-12T09:01:59+5:302017-12-12T16:39:38+5:30
विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.
मिलान- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. विरूष्काने जरी लग्नाची माहिती उघडपणे दिली नाही तरीही रोज काहीना काही नवी माहिती समोर येत होती. अखेरील 11 डिसेंबर रोजी विराट-अनुष्काने सात फेरे घेतले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघांनीही त्यांच्या अधिकृट ट्विटर हँण्डलवरून लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या अलिशान विवाह सोहळ्यात विराट-अनुष्काचा वेडिंग लूक तितकाच साजेसा होता. विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असले. रिसॉर्टची एका दिवसाची किंमत ही सगळ्यांनाच थक्क करणारी आहे,
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार बोर्गो फिनोखिएतो ख्रिसमस आणि न्यूइयरच्या वेळी दर आठवड्याच्या हिशोबाने एक कोटी रूपये किंमत आकारतो. यादरम्यान, बोर्गो फिनोखिएतो हे रिसोर्ट दुनियेतील दुसऱ्या क्रमांकाचं महागड हॉटेल बनतं. प्रतिदिवसाची किंमत मोजली तर इटलीतील बोर्गो फिनोखिएतो या हॉटेलमधील एका सुटची एका दिवसाची किंमत तब्बल चौदा लाख रूपये इतकी आहे. सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत बोर्गो फिनोखिएतोमध्ये सुट्स उपलब्ध आहेत. बोर्गो हे 800 वर्ष जूनं गाव आहे. ज्या गावाला जॉन फिलिप यांनी नवं रूप दिलं व तेथे हे अलिशान रेसॉर्ट उभं केलं आहे. फ्लोरेंस एअरपोर्टपासून बोर्गो फिनोखिएतो जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. या अलिशान रेसॉर्टमध्ये सगळ्या लक्झरीयस सोयी सुविधा आहे. ओवल स्विमिंग पूल, जिम, स्पा, टेनिस कोर्ट सगळ्याच सुविधा तेथे आहेत.
विराट अनुष्काच्या लग्नाच्या वेळी हॉटेलच्या चारही बाजूने कटक सुरक्षा व्यवस्था होती. निमंत्रण पत्रिका घेऊन येणाऱ्या पाहुण्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात होतं.