सिडनी - ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्यूमुखी पडले. आगीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. याशिवाय साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. आगीत भस्मसात झालेल्या प्राणी अन् पक्षांचे छायाचित्र पाहून कोट्यवधींनी देवाचा धावा केला. नागरिकांनी निसर्गाकडे, देवाकडे तेथील स्थिती आटोक्यात यावी म्हणून प्रार्थना केली. या सर्वांची प्रार्थना त्याने ऐकली अन् ऑस्ट्रेलियात वरुण राजाचं आगमन झालं. पावसाच्या आगमनाने तेथील प्राणी, पक्षी अन् जगभरातील मनुष्य सुखावला गेला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या काही भागात लागलेले वणवे विझले आहेत. तर काही भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरीया आणि क्विंसलँडमध्ये पावसाने कहर केला आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये वादळीवाऱ्यसह जोरदार पावसाचा इशारा हा हवामान विभागाने दिला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 75 ठिकाणी आग लागलेली आहे. पाऊस आणि थंडीमुळे तापमानात झालेली घट याचा वापर हा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जात आहे.
आग लागलेल्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. क्विंसलँडमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून तेथील नगरिकांना त्याचा फटका बसला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पूर आला आहे. मात्र आतापर्यंत पावसामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नितांडवात होरपळलेल्या जीवांच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे येत आहेत. क्रिकेटपटूंनीही आपापल्या परीने पीडितांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ऑस्ट्रेलियातील या आगीची तीव्रता पाहून जगभरातील लोकांनी प्राणी-पक्षी अन् माणसांसाठी प्रार्थना केली होती. ऑस्ट्रेलियात पावसाचं आगमन झालं. या पावसाच्या आगमनाने तेथील मनुष्य, प्राणी अन् पक्षांनी अत्यानंद साजरा केला. या पावसाच्या स्वागतात चक्क कांगारूंनी नाचून पावसाच्या सरी आपल्या अंगावर घेतल्या. तर, मदत व बचावकार्य करणाऱ्या तेथील जवानाने दोन्ही हात आभाळाच्या दिशेने उंचावत निसर्गाचे धन्यवाद मानले होते. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे प्राण गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार
CAA लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही- कपिल सिब्बल
कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा पीएफ योजनेस पात्र- सर्वोच्च न्यायालय
साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद