बलुचिस्तानः बलुचिस्तानचं क्वेट्टा शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. क्वेट्टामधल्या मशिदीबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला असून, यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी आहेत.एएनआयच्या माहितीनुसार, बलुचिस्तानमधल्या क्वेट्टाजवळच्या कुचलकजवळ मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे पोलीस हा दहशतवादी हल्ला आहे का याची चाचपणी करत आहेत. तत्पूर्वी मेमध्येही बलुचिस्तानच्या एका मशिदीजवळ रिमोट कंट्रोलनं बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. ज्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तर 11 जण जखमी होते. जेव्हा मशिदीत लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र आले असता, हा हल्ला करण्यात आला.
बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, 15 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 4:47 PM