बांगलादेश पोलिसांकडून 'सुलतान ऑफ सेक्स' अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 11:53 AM2017-08-04T11:53:28+5:302017-08-04T11:59:04+5:30

महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली बांगलादेश पोलिसांनी स्वयंघोषित 'सुलतान ऑफ सेक्स'ला अटक केली आहे

Bangladesh Police arrested Sultan of Sex | बांगलादेश पोलिसांकडून 'सुलतान ऑफ सेक्स' अटकेत

बांगलादेश पोलिसांकडून 'सुलतान ऑफ सेक्स' अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देफुआद उर्फ सुलतानला महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहेमहिलांसोबत शारिरीक संबंध ठेवताना व्हिडीओ शूटिंग करत ब्लॅकमेल करत असेगुन्हे सिद्ध झाल्यास 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते

ढाका, दि. 4 - महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली बांगलादेश पोलिसांनी स्वयंघोषित 'सुलतान ऑफ सेक्स'ला अटक केली आहे. अनेक महिलांना सेक्सचे खासगी व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी ढाका येथील त्याच्या घरावर धाड टाकून अटकेची कारवाई केली. 

फुआद उर्फ सुलतानने शारिरीक संबंध ठेवताना शूट केलेले व्हिडीओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी घरावर धाड टाकून फुआदला अटक केली आहे. पोलिसांनी लॅपटॉप, मेथाम्फेटामाइन टॅब्लेट्स आणि अश्लील व्हिडीओ जप्त केले आहेत. मेल एस्कॉर्ट असलेला सुलतान आपल्या महिला ग्राहकांना ऑनलाइन भेटत असे, त्यानंतर सेक्स करण्यासाठी आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावत असे अशी माहिती बांगलादेश पोलिसांनी दिली आहे. 

'महिलांसोबत घालवलेले खासगी क्षण तो शूट करत असे, त्यानंतर त्यांना तेच व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करायचा. पीडितांमध्ये विवाहित स्त्रिया जास्त होत्या. पैशांसाठी हे सर्व तो करत होतो. लॅपटॉपमध्ये आम्हाला जवळपास 150 महिलांचे व्हिडीओ सापडले आहेत', अशी माहिती पोलीस प्रवक्ता इश्तियाक अहमद यांनी दिली आहे. 

'सुलतान हा व्यवसायाने रिअल इस्टेट एजंट आहे. सोशल मीडियावर सुपरहिरोचा मास्क वापरत तो अश्लील लाईव्ह स्ट्रिमिंग सर्व्हिसही पुरवत होता. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने लोक त्याला फॉलो करत होते, ज्यामध्ये अल्पवयीन तरुणींचाही सहभाग होता', असं इश्तियाक अहमद यांनी सांगितंल 

'अटक केली असता सुलतानने आपले विवाहित महिलांशी संबंध होते अशी माहिती दिली आहे. तसंच आपण सुलतान ऑफ सेक्स असल्याचा दावाही केला आहे. महिलांना सर्व माहिती असतानाही त्या स्वच्छेने माझ्याकडे यायच्या असा दावाही त्याने केला आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मुस्लिम बहुसंख्य राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये पॉर्न बेकायदेशीर आहे. सुलतानविरोधातील आरोप गंभीर असून गुन्हे सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. गतवर्षी बांगलादेश प्रशासनाने 600 पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घातली होती. 
 

Web Title: Bangladesh Police arrested Sultan of Sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.