ढाका -बांगलादेशनेचीनला जबरदस्त झटका दिला आहे. बांगलादेशने कोरोना लशीच्या परीक्षणासाठी पैसे लावण्यास नकार दिला आहे. यामुळे चीनची औषध निर्माता कंपनी सिनोव्हॅक बायोटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या लशीचे परीक्षण अर्धवट अवस्थेत लटकले आहे. बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने चीनी औषध निर्माता कंपनीला निधी देण्यास नकार दिला आहे.
जोवर निधी उपलब्ध होत नाही, तोवर परीक्षणाला उशीर - सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडने 24 सप्टेंबरला म्हटले होते, जोवर सरकार निधी उपलब्ध करवणार नाही, तोवर परीक्षणाला उशीर होईल. एका करारानुसार, सिनोव्हॅक बायोटेक परीक्षणाला लागणारा खर्च उचलणार होती.
सिनोव्हॅकला आपल्या पैशांनी परीक्षण करायला हवे -स्थानिक माध्यमाने आरोग्यमंत्री जाहिद मालेक यांचा हवाला देत म्हटले आहे, की सिनोव्हॅकला आपल्या पैशांनी परीक्षण करायला हवे. कारण परवानगी मागतानाच, त्यांनी ते स्वतःच्या पैशांने हे करतील, असे म्हटले होते. यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली.
कंपनीने निधीसंदर्भात भाष्य केले नव्हते -ते म्हणाले, एखाद्या लशीला परीक्षणासाठी मंजुरी दिल्यानंतर त्या देशाचे काम संपते. कंपनीने परीक्षणासाठी मंजुरी मागताना निधीसंदर्भात कसलेही भाष्य केले नव्हते. चीन सरकार आणि आणच्यात अशा प्रकारचा कुठलाही करार झालेला नाही. हे एक खासगी कंपनी आहे आणि आम्ही अशा खासगी कंपनीला वित्तपुरवठा करू शकत नाही.
"...तरी बांगलादेशला सिनोव्हॅकची लस मिळेल" -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4,200 स्वयंसेवकांवर संबंधित लशीचे परीक्षण करण्यासाठी जवळपास 60 कोटी बांगलादेशी टका एवढा खर्च येईल. यावेळी, परीक्षण योजने प्रमाणे पुढे सरकले नाही, तरी बांगलादेशला सिनोव्हॅकची लस मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.