वाॅशिंग्टन : यंदाचा सप्टेंबर हा आजवरचा सर्वाधिक उष्ण तापमानाचा महिना, तसेच यंदाच्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे हरित वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात उत्सर्जित होण्याच्या आधीच्या काळात म्हणजेच औद्योगिकीकरणाच्या आधीच्या काळात असलेल्या तापमानापेक्षा १.५ अंश सेल्सिअस इतके अधिक तापमान २०२३ या वर्षात आहे.
हवामान तज्ज्ञ केट मार्व्हल यांनी सांगितले की, २०२३ या वर्षांत उष्ण तापामानाबद्दल उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. जपानच्या हवामान खात्याने म्हटले आहे की, २०२० सालातील सप्टेंबर महिन्यापेक्षा यंदाच्या सप्टेंबरमधील उष्ण तापमान ०.५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. याआधी जगात ज्या महिन्यात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली होती, त्यापेक्षा चालू वर्षातील सप्टेंबर महिन्यात ०.२ अंश सेल्सिअस अधिक उष्ण तापमान होते.
२०२३ च्या सप्टेंबर महिन्यातील उष्ण तापमानाचे मोजमाप करण्यात आले. इतका उष्ण महिना
याआधी कधीही अनुभवला नव्हता, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
१६.३८ अंश
सेल्सियसपर्यंत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी तापमान होते, असे कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने (सी३एस) म्हटले आहे.