Beirut Blast Video: बेरुतमध्ये भीषण स्फोटात १० जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी; व्हिडीओ पाहून व्हाल सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:18 PM2020-08-04T23:18:22+5:302020-08-04T23:24:55+5:30
हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत.
बेरुत – लेबनानची राजधानी बेरुत येथे मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटात अनेक लोक जखमी झाले, दुपारच्या वेळेला झालेल्या स्फोटात राजधानीमधील अनेक भाग हादरले तर संपूर्ण आकाशात काळा धूर पसरला होता. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.
बेरुत पत्तननजीक असोसिएसट प्रेसच्या एका फोटोग्राफरने जखमी लोक रस्त्यावर पडल्याचं पाहिलं. बेरुतमध्ये स्फोटाने प्रचंड हाहाकार माजला होता.
लेबनानची राजधानी बेरुत येथे दोन स्फोट, १० जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी #Lebanonpic.twitter.com/1dg9hObfVa
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2020
हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. माझ्या शरीरातून रक्त वाहत आहे.
Lebanon bombed. My House bombed . I am bleeding
— Anchal Vohra (@anchalvohra) August 4, 2020
तर हा स्फोट इतका भयंकर होता की, काही लोकांनी अणुबॉम्बचा स्फोट झाल्याचं सांगत होते. मात्र अद्याप या स्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Extraordinary footage of the explosion of Beirut. pic.twitter.com/yBEGzwYeGv
— Saad Mohseni (@saadmohseni) August 4, 2020