पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. गुलशन-ए-इकबालमध्ये मसकन चौरंगी येथे दुमजली इमारतीत स्फोट होऊन अनेक लोक जखमी झाले. आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉनच्या मते, या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अद्याप स्फोटाचे कारण समजू शकले नाही. मात्र, मुलिना टाऊन पोलिसांच्या एसएचओने सांगितले की प्रथमदर्शनी हा सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा दिसत आहे. बॉम्बस्फोटाचे पथक स्फोटाचे कारण शोधण्यासाठी येत आहे.