Crypto currency Hacking: सर्वात मोठ्या क्रिप्टो करंसी चोरीचा खुलासा, हॅकर्सनी मारला तब्बल 4,468 कोटींवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:39 PM2021-08-11T15:39:35+5:302021-08-11T15:39:49+5:30
Cryptocurrency Heist : क्रिप्टो करंसी ट्रांसफरिंग करणाऱ्या पॉली नेटवर्क कंपनीच्या सिस्टीममधून हॅकर्
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो करंसी(Cryptocurrency Hacking) चोरीचा खुलासा झाला आहे. क्रिप्टो करंसी ट्रांसफरिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या पॉली नेटवर्क(Poly Network) कंपनीने मंगळवारी सांगितल्यानुसार, काही हॅकर्सनी त्यांची सिस्टीम हॅक करुन 600 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 4,468 कोटी रुपयांची क्रिप्टो करंसी चोरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टो करंसी चोरी असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पॉली नेटवर्कने इथेरियम(Ethereum),बायनान्स चेन(BinanceChain) आणि ऑक्सपॉलिगन(OxPolygon) टोकन असलेल्या ट्रेडर्सना, हे कॉइन्स सोडण्याची अपील केली आहे.
कंपनीने अनेक ट्विट करुन या चोरीची माहिती दिली. कंपनीने सांगितल्यानुसार, हॅकर्सनी पॉली नेटवर्कच्या सिस्टीममध्ये घुसून मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करंसी आपल्या अकाउंटमध्ये ट्रांसफर केली. कंपीने हॅकर्सकडून वापरण्यात आलेले ऑनलाइन अॅड्रेस शेअर केले आहेत. या हॅकिंगनंतर ब्लॉकचेन आणि क्रिप्टो एक्सचेंजला या अॅड्रेसवरुन आलेले टोकन्स ब्लॅकलिस्ट करण्यास सांगितले आहे.