मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 08:26 AM2019-02-28T08:26:59+5:302019-02-28T08:46:51+5:30
मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे.
न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिकाफ्रान्स, ब्रिटनकडून याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये मंजूर करण्यात आला. तसेच मसूदवर प्रवासबंदी, शस्त्रबंदी आणि संपत्ती जप्तीची कारवाई करण्याची मागणीही या देशांनी केली आहे. तर, अमेरिकेकडून भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.
मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिमान सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स निर्बंध समितीत मांडू शकेल. ही परिषद 15 सदस्यांची असून, दर महिन्याला तिचे अध्यक्षपद एकेका देशाकडे जाते. हे अध्यक्षपद एक्वाटोरियल ग्युनियाकडून एक मार्च रोजी फ्रान्सकडे जाईल. सुरक्षा परिषदेचा फ्रान्स हा स्थायी सदस्य असून, त्याला नकाराधिकार (व्हेटो) आहे. मसूद अझहर याच्यावर बंदी घातली जावी, अशा प्रस्तावावर फ्रान्स काम करीत असून, तो खूप लवकर तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आली असून तसा प्रस्तावही संयुक्त राष्ट्रात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता, या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र काय भूमिका घेणार याकडे जगातील बहुतांश देशांचे लक्ष्य लागले आहे.
US State dept to ANI:Cross-border terrorism,such as recent attack on India’s CRPF, poses grave threat to security of the area.We reiterate our call for Pakistan to abide by its United Nations Security Council commitments to deny terrorists safe haven & block their access to funds https://t.co/KBwf1k2z74
— ANI (@ANI) February 28, 2019
Reuters: US, UK & France have asked the 15-member United Nations Security Council sanctions committee to subject Maulana Masood Azhar, the head of Pakistan-based militant group Jaish-e-Mohammad, to an arms embargo, global travel ban and asset freeze. https://t.co/lvQYJMI1BW
— ANI (@ANI) February 28, 2019
कंदाहार विमान अपहरणामुळे भारतात मसूद अझहर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या IC 814 विमानाचं 24 डिसेंबर 1999 रोजी अपहरण झालं होतं. त्या विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतानं तीन दहशतवाद्यांना मुक्त केलं होतं. विमानातील 178 प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती.
त्याच्या एक वर्षानंतरच जम्मू-काश्मीर विधानसभेच्या इमारतीत विस्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही मसूद अझहरचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी मसूद अझहरच्या भारत प्रत्यार्पणाची मागणी केली होती. परंतु तसं झालं नाही. 1994ला जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरला अटक केल्यानंतर त्यानं पाकिस्तानमधल्या दक्षिणपंथी कट्टर धार्मिक संघटनासंदर्भात बरीच माहिती दिली होती. मसूद म्हणाला होता की, अफगाणिस्तान, जम्मू-काश्मीर आणि दुसऱ्या भागात पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना मदरशांमध्ये ट्रेनिंग दिलं जातं.
13 ऑक्टोबर 2001ला प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात मसूद अझहरच्या चौकशीसंदर्भातील माहिती उघड करण्यात आली होती. पत्रकार प्रवीण स्वामी यांनी हा रिपोर्ट मिळवला होता. या रिपोर्टमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचं मसूदनं सांगितलं होतं, ही माहिती चौकशीदरम्यान स्वतः मसूद अझहरनं दिली होती. मसूद अझहरनं भारतात पहिल्यांदा गुजराती असल्याचं सांगत प्रवेश केला होता. त्यावेळी पोलिसांना त्याच्यावर एवढा संशय आला नव्हता, असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
मसूद अझहर म्हणाला होता, मी 10 जुलै 1968मध्ये बहावलपूर येथे जन्माला आलो. माझे वडील बहावलपूरमधल्या सरकारी शाळेत हेडमास्टर होते. मला पाच भाऊ आणि सहा बहिणी होत्या. माझ्या वडिलांनी देवबंदमध्ये शिक्षण घेतलं होतं. ते खूपच धार्मिक होते. माझ्या वडिलांचे मित्र मुफ्ती सईद कराचीच्या बिनौरी मशिदीच्या जामिया इस्लामियामध्ये शिकवत होते. मी 1989मध्ये अलमियाची परीक्षा उत्तीर्ण केली.