इंडोनेशियात एका मगरीने ८ वर्षाच्या मुलाला आपली शिकार केलं. घटनेनंतर २६ फूट लांब मगरीला पकडण्यात आलं आणि तिचं पोट फाडून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, मृत मुलाचं नाव दिमस मुल्कान सपुत्रा असं आहे. दिमस त्याच्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी नदीवर आला होता. त्यावेळी ही घटना घडली.
असे सांगितले जात आहे की, दिमस आणि त्याचे वडील किनाऱ्यावर मासे पकडत होते. तेव्हाच अचानक एक मोठी मगर पाण्यातून बाहेर आली आणि मुलाला खेचून पाण्यात घेऊन गेली. इंडोनेशियातील बेन्गॅलोन जिल्ह्यात बुधवारी सकाळी ही घटना घडली.
आपल्या मगर खेचून नेत असल्याचे पाहून दिमसचे वडील सुबलिआंस्याह मगरीचा पाठलाग करत गेले. ते मगरीपर्यंत पोहोचलेही आणि तिला हाताने मारत मुलाला सोडवण्याचा प्रयत्नही केला. पण ते मुलाला वाचवण्यात अपयशी ठरले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मगरीला पकडण्यात आलं आणि तिचं पोट फाडून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याआधीही आठवडाभरापूर्वी इंडोनेशियात एका मुलाला मगरीने मारलं होतं आणि पण त्याचा मृतदेह अजून सापडला नाही.