लंडन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा ११ लाखांहून अधिक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण जग कोरोनावरील लसीची वाट पाहत आहे. सध्या जगभरात जवळपास १५० लसींवर काम सुरू आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यावर कोरोना संकटावर मात करता येईल, अशी आशा सगळ्यांना आहे. मात्र कोरोना लस उपलब्ध झाली तरीही कोरोनाला रोखता येणार नाही, असा दावा ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वॉलेस यांनी केला आहे."कोरोना नियंत्रणात येणार, फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार अॅक्टिव्ह रुग्ण उरणार"कोरोनावरील लस मार्चच्या आधी उपलब्ध होणार नाही, असा अंदाज वॉलेस यांनी वर्तवला. 'कोरोना कधीही पूर्णपणे नष्ट होणार नाही. कोरोनावरील उपचार हंगामी तापासारखे असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लसींसाठी होणाऱ्या संशोधनाचा दर्जा खूप सुधारला आहे. मात्र कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचणं अतिशय कठीण आहे,' अशी माहिती वॉलेस यांनी संसदीय समितीला दिली. कोरोनावरील लस उपलब्ध झाली तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल, याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं वॉलेस म्हणाले.'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मतकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहील, याची शक्यता जास्त आहे. काही काही भागांमध्ये तर कोरोना अतिशय सामान्य होऊन जाईल. मात्र लस टोचली गेल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची शक्यता मावळेल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याची तीव्रता कमी होईल. त्यानंतर कोरोना हा तापासारखा असेल, असं मत वॉलेस यांनी नोंदवलं. एखादी लस कोरोनापासून संरक्षण देते का आणि देत असल्यास किती काळ, या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील, असं ते पुढे म्हणाले.कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपायसध्या अंतिम टप्प्यात असलेल्या बऱ्याच लसींनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार केली आहे. मात्र या लसी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखतात का, हे तिसऱ्या टप्प्यातल्या अंतिम चाचण्यांनंतरच समजेल. यातूनच कोरोना लस किती सुरक्षित आहे, हेदेखील कळेल. मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस कशी दिली जाणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पण पुढील मार्चपर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
CoronaVirus News: लस आल्यानंतरही कोरोनाचा मुक्काम कायम राहणार; तज्ज्ञांच्या दाव्यानं चिंतेत वाढ
By कुणाल गवाणकर | Published: October 20, 2020 7:54 AM