लंडन – भारतात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यात ब्रिटनमधून एक चांगली बातमी समोर येत आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य आकडेवारीच्या विश्लेषणानंतर हे समोर आलंय की, लहान मुलांमध्ये कोविड १९ मुळं गंभीर आणि मृत्यू होण्याचा धोका फार कमी आहे. परंतु कोरोना व्हायरसचं संक्रमण त्या युवकांना अधिक गंभीर करू शकतं जे पहिल्यापासून दुसऱ्या आजाराने पीडित आहेत असं संशोधनात म्हटलं आहे.
यूनिवर्सिटी कॉलेज लंडन, यूनिवर्सिटी ऑफ ब्रिस्टल, यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क आणि यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूल यांच्या संशोधकांच्या रिपोर्टमध्ये १८ वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांचं लसीकरण करावं अशी शिफारस केली आहे. या रिपोर्टमध्ये ३ टप्प्यात विश्लेषण करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील संशोधनात इंग्लंडमधील १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या २५१ मुलांना फ्रेबुवारी २०२१ मध्ये कोविड १९ च्या प्राथमिक केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. संशोधकांनुसार, ब्रिटनमध्ये ४७ हजार ९०३ लोकांमध्ये केवळ एका मुलाला कोविड १९ मुळे संक्रमित होऊन आयसीयूत दाखल करावं लागत असल्याचा अनुमान लावला.
तर दुसऱ्या टप्प्यातील विश्लेषणात इंग्लंडमधील कोविड १९ मुळे २५ मुलांचा आणि युवकांचा मृत्यू झाला. याचा अर्थ ४ लाख ८१ हजार लोकांपैकी एकाला अथवा दहा लाख लोकांमध्ये दोघांना कोरोना संक्रमणामुळे मृत्यूचा धोका असल्याचं कळतं. दोन्ही विश्लेषण करणारे प्रमुख संशोधक प्रोफेसर रसेल वाइनर यांनी सांगितले की, या नव्या रिसर्चमुळे कोविड १९ संक्रमणामुळे गंभीर अथवा मृत्यू होण्याचा धोका लहान मुलांमध्ये फार कमी दिसून येतो. तिसऱ्या टप्प्यातील विश्लेषणात ५५ प्रकरणांचा अभ्यास केला. त्यानंतरही दोन टप्प्यातील विश्लेषणाप्रमाणे यातही तेच निष्कर्ष आढळले. ब्रिटनमध्ये केलेल्या या विश्लेषणामुळे संशोधकांच्या आशा वाढल्या आहेत.
लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला होणार सुरूवात
येत्या सप्टेंबर महिन्यापासून झायडस कॅडिलाची कोरोना व्हॅक्सीन (Zydus Cadila Vaccine) १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते. लसीकरणासंबंधी एका जाणकारांच्या समितीच्या प्रमुखाने हे संकेत दिले आहेत. झायडस कॅडिलाच्या लसीचे लहान मुलांवरील परिणाम सप्टेंबरच्या आधी समोर येतील. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ( National Expert Group on Vaccine) चे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी ही माहिती दिली आहे . एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरोरा म्हणाले की, आपातकालीन वापरासाठी झायडस कॅडिलाच्या लसीला येत्या काही आठवड्यात परवानगी मिळू शकते.
लवकरच कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार
झायडस कॅडिलासह भारतात लहान मुलांसाठी(२-१२ वयोगट) भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन(Covaxin)देखील लवकरच उपलब्ध होऊ शकते. कोव्हॅक्सीनचे फेज ३ ट्रायल सुरू झाले आहेत आणि हे ट्रायल्स सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत २ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण देशात सुरू होऊ शकते.