US व्हिसामध्ये नावात चूक झाली तर ती दुरूस्त करता येते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 09:00 AM2017-08-27T09:00:00+5:302017-08-27T09:00:00+5:30
अशावेळी कॉन्सुलेट या चुकीमध्ये लक्ष घालतं आणि ही चूक का झाली याचा शोध घेतं. जर का अशी चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.
प्रश्न - मला नुकताच अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे. माझ्या लक्षात आलंय की माझं नाव चुकीचं लिहिलं आहे. मला ते दुरूस्त करता येईल का?
उत्तर - हो. तुम्हाला तुमच्या व्हिसामध्ये काही चुका असल्याचं आढळलं, जसं की नाव चुकीचं लिहिलंय, जन्मतारीख चुकीची आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्टूडंट व्हिसामध्ये विद्यापीठाचं नाव चुकलंय तर अशावेळी तुम्ही support-india@ustraveldocs.com इथं ई-मेल करा आणि काय चूक झालीय ती निदर्शनास आणून द्या.
अशावेळी कॉन्सुलेट या चुकीमध्ये लक्ष घालतं आणि ही चूक का झाली याचा शोध घेतं. जर का अशी चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.
जर का ही चूक कॉन्सुलेटची नसेल, उदाहरणार्थ जर नाव देतानाच चूक झाली असेल तर तुम्हाला अर्जाची पुन्हा किंमत भरावी लागेल, व नंतर ती चूक सुधारून देण्यात येईल.
अर्थात, एक वर्षापेक्षा जास्त जुना असलेल्या व्हिसातील चुका आम्ही सुधारू शकत नाही. तुमचा व्हिसा एक वर्षांपेक्षा जुना असेल आणि त्यात काही चुका असतील तर तुम्हाला नव्यानं व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सगळी माहिती नीट दोन तीन वेळा वाचून अचूक असल्याची खात्री करणं केव्हाही श्रेयस्कर असेल. त्यामुळे तुमच्या व्हिसामध्ये चूका राहणार नाहीत. व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.