कॅनडातही पंतप्रधान मोदींचा बोलबाला, 'या' कारणाने पोस्टर लावून करून केलं जातंय कौतुक....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:36 PM2021-03-11T13:36:53+5:302021-03-11T13:39:58+5:30

PM Narendra Modi : कॅनडामध्ये अनेक ठिकाणी लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर

canada thanking pm narendra modi for providing covid 19 vaccines places billboards in greater Toronto area | कॅनडातही पंतप्रधान मोदींचा बोलबाला, 'या' कारणाने पोस्टर लावून करून केलं जातंय कौतुक....

कॅनडातही पंतप्रधान मोदींचा बोलबाला, 'या' कारणाने पोस्टर लावून करून केलं जातंय कौतुक....

googlenewsNext
ठळक मुद्देकॅनडामध्ये अनेक ठिकाणी लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टरभारतानं केला होता कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा

कोरोनाच्या महासाथीनं संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. यामुळे संपूर्ण जगात आजही कोरोनाची दहशत आहे. मात्र, आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतानं कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला होता. आता कॅनडानं कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवाठा केल्याबाबत भारत आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच स्तुतीही केली आहे. 

कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या महासाथीत भारतानं अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला. याबाबत अनेक देशांनी भारताचे आभारही मानले आहेत. भारतानं नुकतंच कॅनडाव्यतिरिक्त नेपाळ आणि बांगलादेशसह अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला होता. भारतानं आजवर अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करत कोरोना महासाथीशी लढण्यास मदत केली आहे. 

भारतातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीचे पाच लाख डोस कॅनडामध्ये पोहोचले आहे. आम्ही पुढील काळातील सहयोगासाठी तत्पर आहोत, असं प्रतिपादन कॅनडाच्या मंत्री अनिता आनंद यांनी केलं होतं. तर दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताकडे कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लसीचा पुरवठा करणार असल्याचं आश्वासन दिलं. कॅनडाची जेवढी मागणी आहे तितक्या लसींचा पुरवठा करण्यास भारत प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. 
 


ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीही मानले होते आभार

भारतानं ब्राझीललाही कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या २० लाख डोसचा पुरवठा केला होता. त्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले होते. त्यांनी भगवान हनुमानाचा संजीवनी बुटी घेऊन जातानाचा फोटो शेअर करत ट्वीट केलं होतं. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते.

Web Title: canada thanking pm narendra modi for providing covid 19 vaccines places billboards in greater Toronto area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.